राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस गायिका असून त्यांच्या गाण्याचीही चर्चा होत असते. पण, ८ मार्च अर्थात जागतिक महिला दिनानिमित्ताने यांनी खास व्हिडीओ ट्विट करत सगळ्यांना एक आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज जगभरात महिला दिन साजरा होत असून, यानिमित्ताने सगळीकडे स्त्रीशक्तीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. महिला दिनाचं निमित्त साधत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओत अमृता फडणवीस मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

‘दरवर्षीच महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाशी प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्त्रीविषयी एक वेगळी आत्मियता निर्माण होते आणि यावर्षीदेखील असं होणार. मात्र मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षितता, स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री प्रगती याबाबतीत खूप काही बोललं जातं आहे. पण एकीकडे असं होत असताना दुसरीकडे मात्र स्त्रीवरील अत्याचार वाढताना दिसत आहेत. स्त्रियांवर होणारे बलात्कार, घाण प्रकारे होणारी ट्रोलिंग, स्त्रियांच्या होत असलेल्या आत्महत्त्या हे प्रचंड वाढलं आहे,’ असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली.

पुढे त्या म्हणाल्या, ‘मला हेच सांगायचं आहे की, स्त्रियांच्याबाबतीत तुम्ही जे बोलता, त्यांच्याशी कसं वागता याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता पुरोगामी महाराष्ट्रात काही बदल घडवून आणायचा असेल, तर तो तुम्हीच घडवून आणू शकता. स्त्रीला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर तुम्ही तिची साथ द्या, त्यांना मागे ओढू नका… तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा… ,’ असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

आज येणार गाण…

“केवळ जीवन जगते आहे असे नाही, तर स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्त्व असले पाहिजे- या विषयावर माझे काही विचार मांडते आणि याच बाबत स्त्री शक्ति वर आधारित डॉ. रख्माबाई चित्रपटाचे माझे गीत नक्की ऐका ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी,” अशी माहितीही त्यांनी ट्विटद्वारे दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International womens day amruta fadnavis shares a video on the occasion of womens day bmh
First published on: 08-03-2021 at 08:39 IST