सांगली : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे पहिल्याच दिवशी २१ जणांनी उमेदवारी मागणीचे अर्ज घेतले. पक्षाचे प्रभारी अशोक खोत, भास्कर कदम, प्रा. दत्तात्रय पाटील यांनी इच्छुकांना उमेदवारी अर्जाचे वाटप केले.
इस्लामपूर हा आमदार जयंंत पाटील यांचा गड मानला जातो. मात्र, सात वर्षांपूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये भाजपचे निशिकांत भोसले-पाटील यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जिंकली होती. आताही नगरपालिका निवडणुकीत आमदार पाटील यांची कोंडी करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नुकतीच याबाबत आमदार सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, निशिकांत भोसले-पाटील आणि अन्य नेत्यांची प्राथमिक बैठकही झाली आहे. एकसंघपणे निवडणूक लढविण्याबाबत चर्चाही झाली आहे.
निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक घेणार असून, त्याचा अहवाल जिल्हाध्यक्षांकडे व प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अशोक खोत व भास्कर कदम यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने इच्छुकांना उमेदवारी मागणी अर्ज देण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी विक्रमी २१ अर्ज इच्छुकांनी घेतले. यामध्ये एकूण १५ प्रभागांसाठी रियाज मुबारक पटेल, आरती अमोल खोत, विश्वास यशवंत साळुंखे, विद्या शिवाजी पवार, अजित विजयराव पाटील, संजना संजय तेवरे, रेखा मुकुंद रासकर, रुक्साना फारुख इबूशे, फिरोज हारुण पटेल, अक्षय विजयराव कोळेकर, रुपाली अभिजित पाटील, अक्षय हणमंत पाटील, भास्कर केरबा कदम, अनुजा स्वप्नील देशमुख-कोरे, संदीप सुनील वायदंडे, सदानंद दिनकर कुंभार, सलीम कच्छी, महेश परांजपे, स्नेहा बाबासाहेब जाधव, अमर बनसोडे, जयकुमार कांबळे आदी इच्छुक उमेदवारांनी पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून निवडणूक लढण्यासाठी अर्ज घेतले.
इच्छुक उमेदवारांचे सामाजिक, राजकीय, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील कामकाज पाहिले जाणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक घेणार असून, त्याचा अहवाल जिल्हाध्यक्षांकडे व प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अशोक खोत व भास्कर कदम यांनी दिली. इस्लामपूर हा आमदार जयंंत पाटील यांचा गड मानला जातो. मात्र, सात वर्षांपूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये भाजपचे निशिकांत भोसले-पाटील यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जिंकली होती.
