Sanjay Raut and Uddhav Thackeray Interview Highlights: ‘भाजपाने देशभर आणीबाणीचा दिवस विचित्र पद्धतीने त्याची आठवण करून दिली. हेच लोक होते ज्यांनी त्यावेळी आणीबाणीला विरोध केला होता. आता हेच लोक आणीबाणी आणू इच्छितात. अघोषित आणीबाणी आणलेली आहे. ज्या गोष्टीला तेव्हा विरोध केलेला ती गोष्ट ते आणत आहेत. इंदिरा गांधींनी उघड केलं होतं की आणीबाणी लादत आहे. यांच्यामध्ये ती हिंमत नाही. तू आमच्या पक्षात ये नाहीतर टाडा लावतो. आमच्या पक्षात ये नाहीतर मिसा लावतो. मकोका लावतो. पीएमएलए लावतो. असं आहे’, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी ही भूमिका मांडली.

‘दहशतवाद, नक्षलवाद संपवत आणला असेल तर आता का कायदा आणताय? जर तुमच्याकडे ६४ नावं आहेत तर ती नावं जाहीर करा. त्यांची पापं जाहीर करा आणि त्यांच्यावर बंदी टाका. आम्ही कुठे काय म्हणतोय. देशासाठी सर्व राजकीय पक्षांनी पंतप्रधानांना पाठिंबा दिला. नक्षलवादाविरुद्ध पोलिसांनी, सीमा सुरक्षा दलाच्या लोकांनी शौर्य दाखवलं’, असं उद्धव म्हणाले.

‘वारीत अर्बन नक्षली घुसले अशी आवई’

उत्तरेकडच्या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणाले होते. शेतकरी जो न्यायहक्कांसाठी रस्त्यावर उतरला तो अतिरेकी. वारीत अर्बन नक्षल घुसलेत अशी आवई उठवण्यात आली. हिंदूंचे सण सुद्धा मारायचे आहेत. वारीमध्ये नक्षली घुसलेत म्हणजे वारीत जाऊ नका. कोणतं हिंदुत्व आहे तुमचं. सरकारची मानसिकता गोंधळलेली आहे. त्यांना सत्ता मिळालेय त्याचं करायचं काय तेच कळत नाहीये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जनसुरक्षा विधेयकात स्पष्टता नाही’

‘या विधेयकाने महिलावंर अत्याचार थांबणार का, लुटमार थांबणार का, तसं नाहीये. त्याची सुरुवात कडवा डावा म्हणजे काय, डावी विचारसरणी म्हणजे काय? नक्षलवाद व दहशतवाद संपवायला काहीच हरकत नाही, पण या जनसुरक्षा विधेयकात स्पष्टता नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.