सांगली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या अनुपस्थितीत इस्लामपूर येथे भारत राष्ट्र समितीचा मेळावा पार पडला. के. चंद्रशेखर राव यांनी शेतकर्‍यासाठी सकारात्मक निर्णय घेउन विविध योजना राबविल्याबद्दल इस्लामपूरमध्ये त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. मात्र, अचानकपणे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. प्रकृर्ती अस्वास्थ्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असला तरी पक्षाचे प्रभारी आणि के. चंद्रशेखर राव यांचे पुतणे के. वामसिध्द राव यांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये गेल्या आठवड्यात के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर बुधवारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी इस्लामपूरातील ख्रिश्‍चन ग्राउंडवर भव्य मंडपही उभारण्यात आला होता. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उपस्थित होउ शकले नाहीत. प्रकृर्तीच्या कारणावरून ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बीआरएस पक्षाचे प्रभारी के. वामसिध्द राव यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. मेळाव्यात श्री. पाटील यांनी सरकारच्या आतापर्यंतच्या शेतकरी विषयक धोरणामुळेच राज्यातील शेतकर्‍यावर टाचा घासून मरण्याची वेळ आली असल्याने आपण भारत राष्ट्र समितीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय शेतकर्‍यांचे कोणतेच भले करणारा नाही असेही ते म्हणाले.