युवक काँग्रेस कार्यकर्त्यां कल्पना गिरी यांच्या खुनाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी दिली. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या बाबत लातूर पोलिसांना लेखी आदेश दिले.
या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्याची विनंतीही करण्यात आली. गेल्या २१ मार्चला युवक काँग्रेसच्या लातूर विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीस कल्पना गिरी गायब झाल्या होत्या. तुळजापूरजवळील तलावात दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली. दोघे अजून फरारी आहेत. शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी सुरुवातीपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. अखेर दीड महिन्यानंतर पोलिसांनी आता हे प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2014 रोजी प्रकाशित
कल्पना गिरी खूनप्रकरणी तपास अखेर सीआयडीकडे
युवक काँग्रेस कार्यकर्त्यां कल्पना गिरी यांच्या खुनाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी दिली. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या बाबत लातूर पोलिसांना लेखी आदेश दिले.
First published on: 11-05-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalpana giri murder case go to cid