कराड : पाटण तालुक्यातील डोंगर पठारावरील एका गावात भर दुपारी एकाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडली. संबंधित व्यक्तीस ढेबेवाडी पोलिसांनी ‘पोक्सो’ अंतर्गत अटक केली असून, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीला संबंधित तरुणाने त्याच्या घरी बोलावले. या वेळी त्याने कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगायची नाही, सांगितलीस तर जिवे मारीन, अशी धमकीही त्याने दिली. घाबरलेल्या मुलीने आई घरी आल्यानंतर तिला हा प्रकार सांगितला. याबाबत आईने ढेबेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यावर संबंधित तरुणास अटक केली. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण डाईंगडे हे करत आहेत.