कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावर नारायणवाडी-आटके टप्पा येथे बेकायदेशीररीत्या दहा जर्सी जातीच्या गायींची वाहतूक करणारा टेम्पो कराड ग्रामीण पोलिसांनी पकडला. टेम्पोत घुसमट झालेल्या या गायींची सुटका केली. तर, हमद मगतुमसाब हुसेन व लिंगेशा एस. गोपाळ (दोघेही राहणार ता. जि. दावणगिरी, कर्नाटक) यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रहिमतपूर येथील ओम शेरकर हे कामानिमित्त कराडात आले होते. त्यावेळी कराडच्या आठवडी बाजारातून एका टेम्पोतून गायींची वाहतूक केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी ती कराड ग्रामीण पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलीस पथकाने पुणे-बंगळुरू महामार्गावर नारायणवाडी-आटके टप्पा येथे हा टेम्पो पकडला. यामधून बेकायदेशीररीत्या दहा जर्सी जातीच्या गायींची वाहतूक होत असल्याचे आढळले. टेम्पोत जर्सी जातीच्या दहा गायी दाटीवाटीने कोंबल्याचे आढळले. त्या गाईंची चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूरपणे वागणूक दिल्याप्रकरणी तसेच बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे लक्षात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेम्पोत घुसमट झालेल्या या गायींची सुटका केली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी तर, हमद मगतुमसाब हुसेन व लिंगेशा एस. गोपाळ (दोघेही राहणार ता. जि. दावणगिरी, कर्नाटक) यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.