सावंतवाडी : गेल्या चार दिवसांपासून वैभववाडी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे करूळ घाटात शुक्रवारी दरड कोसळली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक एका तासाच्या आत सुरळीत केली.

करूळ चेक पोस्टपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर रस्त्यावर ही दरड पडली होती. घटनेची माहिती मिळताच रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी तैनात असलेल्या वेल्हाळ कंपनीच्या जेसीबीच्या सहाय्याने तातडीने काम सुरू करण्यात आले. अवघ्या तासाभरात दरड पूर्णपणे बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दरड कोसळल्याची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.