करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मुंडेच्या दबावामुळेच माझ्या आईने आत्महत्या केला असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. एवढंच नाही तर, मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल असे खबळजनक वकतव्यही शर्मा यांनी केले आहे.

राष्ट्रवादी मुंडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप

करुणा शर्मा यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी धनंजय मुंडेवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. धनंजय मुंडेनी माझ्या बहिणाला खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबून ठेवले, कारण रेणू शर्मा धनंजय मुंडेंबाबत पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार होती, मात्र, त्या अगोदरच तिला पोलिसांनी अटक केल्याचा आरोप करुणा शर्माने केला आहे. तसेच “मी धनंजय मुडेंविरोधात दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडेना पाठीशी घालत आहेत. मी आत्तापर्यंत पवार साहेबांचा मान ठेवत होते. मात्र, या प्रकरणात ते अशा व्यक्तींना पाठीशी घालत असल्याचे बघून वाईट वाटतं” असल्याचेही करुणा शर्मा म्हणाल्या.

मुंडेंचे अन्य महिलांशीही अनैतिक संबंध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच “आपली मुलगी शिवानी धनंजय मुंडे पत्रकार परिषद घेणार होती. मात्र, तिला धमकवल्यामुळे ती पत्रकार परिषदेत गैरहजर राहिली” असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या. “धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आमच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यांच्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली” असल्याचा आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे. तसेच मीच मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा शर्मांनी केला आहे. “२००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून मी माझ्या बहिणींशी बोलत नाही. मुंडेंनी मंत्री पदाचा गैरवापर केला. पवारांनी मुंडेंना मंत्री पदावरून हकललं पाहिजे. धनंजय मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध आहेत याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे खळबळजनक वक्तव्यही करुणा शर्मा यांनी केले आहे.