ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका कविता महाजन यांचे आज सायंकाळी अचानक अल्पशा आजाराने निधन झाले. कविता महाजन यांनी पाच दिवस आधीच फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आजारपणाबद्दल सांगताना काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेरच्या दिवसातही त्यांची काम करण्याची प्रचंड तळमळ होती.

कविता महाजन यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ब्र, भिन्न आणि कुहू या कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती. साहित्य अकादमी पुरस्काराच्या त्या मानकरी होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५ सप्टेंबर १९६७ रोजी त्यांचा नांदेड येथे जन्म झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य विषयात एम.ए. केले होते.