मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घोडेबाजाराच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यात ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्यामुळे औरंगाबादमधलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा दौरा राजकीय चर्चेचा विषय ठरला असताना भाजपा नेते किरीट सोमय्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“ही काय अवस्था झालीये शिवसेनेची?”

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजाराचा आरोप होत असताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “मला हेच समजत नाहीये की काय चाललंय? औरंगाबादला काय आमदार विकत घ्यायला चाललेत का? ही काय अवस्था झालीये शिवसेनेची? सरकारकडून जनतेचा जो पैसा वसुलीद्वारे आलाय, त्याचा उपयोग स्वत:च्याच आमदारांना विकत घेण्यासाठी माफिया सेना करतेय. इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की स्वत:च्या आमदारांना स्वत:कडे ठेवण्यासाठी वसुलीच्या पैशांचा वापर केला जातोय”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी ध्रुवीकरणाचे वातावरण ; विकास प्रश्नांवरून विरोधक आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्रात आम्ही फिरतो तेव्हा लोक आम्हाला प्रश्न विचारतात की स्वत:च्या आमदारांना बिकाऊ म्हणणारा हा मुख्यमंत्री? आमदारांना अँटिचेंबरमध्ये काय सांगत असतील, सौदेबाजी चालू असेल माहिती नाही. हे काय होतंय ठाकरे साहेब?” असा खोचक सवाल देखील किरीट सोमय्यांनी यावेळी केला.