गोकुळ दूध संघाची राजकीय हंडी फोडण्यात आमदार महादेवराव महाडिक यांना यश आले. सत्तारुढ गटाकडून अध्यक्ष दिलीप पाटील व संचालक पुत्र सदानंद हत्तरगी यांचा धक्कादायक पराभव झाल्याने सत्ताधाऱ्यांना आनंदाची चव चाखता आली नाही. १८ जागांपकी १६ जागांवर सत्ताधाऱ्यांनी विजय प्राप्त केला.  राज्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळची ओळख  आहे. या संस्थेवर काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कडवे आव्हान दिले होते. ठरावधारक मतदारांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून सहलीसाठी नेले होते. शिवाय विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्याची संधी यानिमित्ताने तालुक्यातील नेत्यांनी साधली होती. यामुळे गुरूवारी ९९ टक्क्याहून अधिक मतदान झाल्याने  निकालाची उत्सुकता होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur dudh sangh election
First published on: 25-04-2015 at 05:30 IST