कोल्हापूर परिसरात काल म्हणजे शनिवारी रात्री ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाने दिली आहे. ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरच्या पश्चिमेला १९ किलोमीटर अंतरावर होता.कोल्हापूरपासून १९ किलोमीटर कळे गावाजवळ केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौम्य भूकंपाचे धक्के असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. काही भागांत भूकंपाचे धक्के सर्वसामान्यांना जाणवले नसल्याचीही माहिती समोर येत आहे. वारणा खोरे व कळे हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. भूकंपाची खोली जमिनीच्या आत ३८ किलो मीटर असल्याने भूकंपाचा धक्का जाणवला नाही.


वारणा भुमापन केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाची नोंद झाल्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष दक्ष झाले होते पण कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही उजनी खरात भूकंप झाल्याची नोंद आहे.

कोल्हापूरबरोबरच आजूबाजूच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचबरोबर, सोलापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळानं दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur earthquake latest news kolhapur news kolhapur updates vsk
First published on: 05-09-2021 at 13:22 IST