कोल्हापूर : येथील नागरिक प्रा. अरविंद शंकर परांडेकर आणि त्यांच्या भगिनी श्रीमती कुंदा कृष्णकांत देशपांडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे मंगळवारी अनुक्रमे ५ लाख आणि २५ हजार आपल्या देणगीचे धनादेश सुपूर्द केले.
प्रा. परांडेकर यांनी आपली पत्नी कै. अरुंधती यांच्या स्मरणार्थ देणगीचा धनदेश दिला. बंधूंच्या प्रेरणेतून त्यांच्या भगिनी कुंदा देशपांडे यांनीही मातोश्री कै. विमलाबाई शंकर परांडेकर यांच्या स्मरणार्थ देणगीचा धनदेश दिला. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी देणगीदरांचा ग्रंथभेट देऊन गौरव केला.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. गिरीष कुलकर्णी, उप कुलसचिव रणजीत यादव, फिरोझ नायकवडी, गिरीष सुर्वे, प्रियांका सुर्वे, राहुल उपस्थित होते.