नियमित कामकाज आटोपून चहा पित बसलेल्या पांडूरंग उलपे अचानक घाम फुटतो. हृदयविकाराचा झटका येतो. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं जातं. रुग्णालयातील डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात अन् घरात एकच शोककळा पसरते. पत्नी हंबरडा फोडते तर नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटतो. घरात अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच पांडुरंग उलपे जिवंत असल्याची बातमी कानी येते आणि घरातील वातावरण एकदम आनंदात बदलतं. हे कथानक चित्रपट किंवा एखाद्या मालिकेतील वाटेल. पण असं प्रत्यक्षात घडल्याचा दावा उलपे कुटुंबाने केला आहे. मृत घोषित करून नंतर जिवंत झालेल्या व्यक्तीनेच संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

मला घाम आला अन्…

याबाबत पांडुरंग उलपे म्हणाले, “माझा नित्य दिनक्रम असतो. सकाळी कामाला जायचं, काम करून दुपारी १२ वाजेपर्यंत यायचं. घरी आल्यावर जेवायचं अन् झोपायचं. तीन तास विश्रांती घ्यायची. मग पाच वाजता पुन्हा फिरायला जायचं. त्यादिवशी मी साडेचार वाजता चहा पित होतो. तेवढ्यात मला घाम आला. चक्कर आली नाही. घाम का आला म्हणून मी बाहेर बसलो.”

पांडुरंग उलपे हे वारकरी संप्रादयाचे नित्याची कामे करून दिवसभराची गुजराण करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा नित्य दिनक्रम सुरू होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते चहा पित बसले होते. परंतु, अचानक त्यांना घाम आला. त्यामुळे मोकळ्या हवेत जावं म्हणून ते बाहेर आले. परंतु त्रास कमी झाला नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू करताच त्यांना मृत घोषित केलं.

हेही वाचा >> Kalyan Crime : कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

स्पीड ब्रेकरच्या धक्क्यामुळे…

पुढील घटनेविषयी त्यांचा नातू सांगतो, “आम्ही पुढील प्रक्रियेसाठी घरी येत होतो. चौघुले गल्लीच्या आसपास स्पीड ब्रेकरमुळे गाडीला धक्का बसला. त्यामुळे आजोबांचं मृत शरीर आदळल्यासारखं झालं. त्यानंतर त्यांच्या शरीराची हालचाल आम्हाला जाणवू लागली. त्यांची बोटं हालायला लागल्याचं आम्ही पाहिलं. आम्ही गाडी बाजूला घेऊन पाहिलं. जवळच्या रुग्णालयात नेऊन त्यांचा ईसीजी काढला. त्यात त्यांचं हृदय पुन्हा सुरू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आम्ही त्यांना पुढील उपचारांसाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केलं. एका स्पीड ब्रेकरमुळे आमच्या आजोबांना जीवनदान मिळालं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी पांडुरंग उलपे म्हणाले, “नातवांच्या, शेजाऱ्यांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेमुळे मला जीवनदान मिळालं आहे.” पांडुरंग उलपे हे कोल्हापुरातील कसबा बावडा येथे राहत असून त्यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय यानिमित्ताने अवघ्या देशाला आला असेल.