कोकण रेल्वे आज शुक्रवार दि. १० जून ते ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर ९५० कर्मचारी गस्त घालणार आहेत. संवेदनशील ३८ ठिकाणी २४ तास चौकीदार ठेवण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेचे आज १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक सुरू झाल्याने गाडय़ांच्या वेळा पण बदलण्यात आल्या आहेत. गाडय़ांचा वेग कमी करण्यात येणार असून प्रतिघंटा ४० किलोमीटर वेगाने गाडय़ा धावणार आहेत. कोकण रेल्वेने कोलाड ते ठाकुर्ली (मंगळूर)पर्यंत सुरक्षा ठेवली आहे. पावसाळी सुरक्षा ठेवतानाच पावसाळ्यामुळे रेल्वे ट्रॅकची दक्षता घेण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षांपासून पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवर बोल्डर कोसळत असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षितेसाठी कोलाड ते ठाकुर्लीपर्यंत ९५० कर्मचारी गस्तीवर ठेवण्यात आले आहेत. संवेदनशील ठिकाणी २४ तास चौकीदार असतील. या काळात कोकण रेल्वे मार्गावर सातत्याने दक्षता घेण्यात येईल, असे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता व महाप्रबंधक सिद्धेश्वर तेलगू यांनी म्हटले आहे. कोकण रेल्वेची प्रत्येक स्टेशन २५ वॉट बी.एच.एफ. बेस स्टेशन सज्ज करण्यात आले आहे.
मोबाइल, वॉकीटॉकी कर्मचारीवर्गाला देण्यात आले आहे. आपत्कालीन यंत्रणादेखील सज्ज असून सॅटेलाइट फोन संचारसुद्धा होणार आहे.
पावसाळी काळात बेलापूर, रत्नागिरी व मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहतील. प्रवाशांनी http://www.konkanrailway.com या व १३९ क्रमांकावर डायल करावे. अन्यथा टोलफ्री १८००२३३१३३२ येथे रेल्वेचे प्रवासाचे वेळापत्रक कळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2016 रोजी प्रकाशित
कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक आजपासून सुरू
कोकण रेल्वे आज शुक्रवार दि. १० जून ते ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 10-06-2016 at 00:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway monsoon schedules