रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील दिवाण खवटी बोगद्याजवळ कोसळलेली दरड हटविण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला चौवीस तासाने यश आले तरी  या मार्गावरील वाहतुकीचे वेळापत्रक अद्यापही कोलमडलेले आहे. या मार्गावरील मडगांव -मुंबई  कोकण कन्या एक्सप्रेस, सावंतवाडी – दादर  तुतारी एक्सप्रेस, रत्नागिरी -दिवा पॅसेंजर  तसेच मुंबई – मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर तीन गाड्या चार ते सात तासांनी उशिरा धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होत  आहेत.

हेही वाचा >>> महापालिकेच्या शिक्षण खात्यात ३३० कोटींचा घोटाळा; निविदा प्रक्रियेतील हलगर्जीपणामुळे शैक्षणिक साहित्य विलंबाने, काँग्रेस पक्षाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण रेल्वे मार्गावरील वहातुक दरड हटविण्यात आल्यावर सुरळीत झालेली असली तर कोकण रेल्वे सलग दुस-या दिवशीही उशिराने धावत आहे. कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेडणे येथे बोगद्यात चिखल आणि पाणी साचल्यानंतर खेड जवळील दिवाण खवटी येथे  दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेची वहातूक चौवीस तासांसाठी ठप्प झाली होती. ही दरड  हटविण्यात आल्यानंतर ही कोकण रेल्वे प्रशासनाला वेळापत्रकाप्रमाने गाड्या सोडणे अजुनही शक्य झाले नाही. या मार्गावर धावणारी मडगांव -मुंबई  कोकण कन्या एक्सप्रेस, सावंतवाडी – दादर  तुतारी एक्सप्रेस, रत्नागिरी -दिवा पॅसेंजर  तसेच मुंबई – मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस  या चार रेल्वे गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. तसेच कोकण रेल्वे मार्गावर धावणारी एर्नाकुलम निजामुद्दिन एक्सप्रेस, मुंबई-मडगांव  तेजस एक्सप्रेस, तिरुनेलवेली जामनगर एक्सप्रेस, शालिमार वास्को दी गामा एक्सप्रेस या चार रेल्वे गाड्या  चार ते सात तास उशिराने धावत आहे.