सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या भूमीरेखांकनास शेतकऱ्यांकडून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे तासगाव तालुक्यातील गव्हाणपाठोपाठ सावळज येथेही बुधवारी भूमीसंपादनाची प्रक्रिया अधिकारी न आल्याने रखडली.
शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील १९ गावांतून प्रस्तावित असून, सुमारे दोन हजार एकर जमीन त्यासाठी संपादित करण्यात येणार आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात तीव्र विरोध आहे. मंगळवारी गव्हाण या ठिकाणची मोजणी बंद पाडण्यात आली, भर पावसात शेतकरी मोजणीला विरोध करण्यासाठी सायंकाळी सहापर्यंत थांबले होते. तहसीलदार यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व मोजणी कर्मचारी परतल्यानंतरच सर्व शेतकरी पांगले.
दरम्यान, आंदोलनाचा धसका घेतल्याने सावळज येथे मोजणीसाठी अधिकारी बुधवारी आलेच नाहीत. त्यामुळे सर्व शेतकरी सावळज कालव्यावर एकत्र आले. त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे. मात्र, यावर समाधान न मानता कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील एक इंचही जमीन मोजू द्यायची नाही, अशीच एकी आणखी वर्षभर टिकवावी लागेल. जोपर्यंत शक्तिपीठ रद्दचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत संघर्ष तेवत ठेवूया. यावेळी प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, राकेश कांबळे, सुनील कांबळे, दत्ता पाटील, विकास पाटील, नवीन पाटील, धनाजी पाटील, नितीन झांबरे, रवींद्र साळुंखे, संतोष देसाई व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.