राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. करोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना करोनाची मोठ्या संख्येनं लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ११४ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील २३२५ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे तर २६ पोलिसांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्रं आपलं कर्तव्य बजावत आहेत. आपण घरात सुरक्षित रहावं म्हणून जीव धोक्यात घालून देशभराती पोलीस उन्हातान्हात रस्त्यांवर बंदोबस्तास उभे आहेत. या पोलिसांना देखील करोनाने घेरले असून त्यांचा जीव देखील धोक्यात आल्याचे दिसत आहे.

In last 24 hours, 114 police personnel have tested positive for #Coronavirus in Maharashtra and 1 personnel has died due to the virus. The total number of COVID-19 infected personnel is now 2,325 in the state and 26 have died so far: Maharashtra Police pic.twitter.com/WuKZ4RFoLY

— ANI (@ANI) May 30, 2020

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last 24 hours 114 police personnel have tested positive nck
First published on: 30-05-2020 at 14:32 IST