रत्नागिरी :  भास्कर जाधव या सापाला मी दूध पाजले आहे. पण आता याचा फणा ठेचल्याशिवाय राहणार नाही. याला पुढील विधानसभा बघू देणार नाही, असा निर्धार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शनिवारी रात्री गुहागर तालुक्यातील  श्रृंगार तळी येथे मेळावा आयोजित करण्यात आला या वेळी आमदार जाधव आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका करताना कदम म्हणाले की, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माझा बळीचा बकरा करण्यासाठी पाठवले होते.  मी मातोश्रीह्णला सांगून आलो होतो की, मी मराठा आहे. त्यामुळे लढून पडणार आहे. या वेळी माझ्याशी गद्दारी झाली. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून अनंत गीतेंनी माझ्या विरोधात प्रचार केला. माझ्याशी दगाबाजी करण्यात आली. या वेळी भाजपाचे डॉ. विनय नातू यांना बाळासाहेब ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यपद देतो, असे सांगूनही त्यांनी माघार घेतली नाही. पण निवडणुकीत पडल्यानंतर या मतदारसंघात आलो नाही, ही माझी चूक झाली.

हेही वाचा >>> शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रविंद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला १७३ कोटी…”

jayant patil, ajit pawar, jayant patil crticises ajit pawar, shivaji adhalrao patil, amol kolhe, shirur lok sabha seat, election campaign, public meet, lok sabha 2024, election 2024, marathi news, ncp sharad pawar,
पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला
vishal patil sanjay raut
“…म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”, राऊतांचा विशाल पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यामागे…”
Raju Shetti, Lok Sabha Election Campaign, krantisinh nana patil, machhindra village, hatkangale lok sabha seat, lok sabha 2024, election Campaign, Raju Shetty in machhindra village, Raju Shetty's Election Campaign, marathi news,
नैतिकतेच्या जोरावर चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकणार; प्रचार शुभारंभ सभेत राजू शेट्टी यांचा विश्वास
Bachchu Kadu On Navneet Rana Ravi Rana
“नवनीत राणांना पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो…”; बच्चू कडू यांचा पलटवार

जंगलातून वाघ गेला की लांडगे बाहेर पडतात तसे येथे लांडग्यांचे फावले. मागील निवडणुकीत गुहागरमधून भाजप नेत्याला मदत करण्याच्या बदल्यात दापोलीमध्ये योगेश कदमला भाजपवाले मदत करणार होते. तरीही मी माझ्या मुलासाठीही बेईमानी केली नाही. भास्कर जाधव शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. मंत्रीपद व त्यानंतर पक्ष ताब्यात घेतला. तरीही समाधानी राहिले नाहीत. सर्व कंत्राटे यांनाच पाहिजेत. बेईमानाची अवलाद, तुम्ही माझ्यावर बोलता? जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा.

कोकणात अलगी उगवली की पाऊस येतो. तसेच अनंत गीते आले की निवडणूक आली असे समजले जाते, अशी टीका करून कदम म्हणाले की, ज्या समाजाच्या जोरावर पाच वेळा खासदार व मंत्रीपद घेऊनही अलिबागपासून गुहागपर्यंत असे कोणते एखादे मोठे काम केले ते यांनी सांगावे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. मी भाजपबाबत आक्रमक बोललो, त्याला वेगळे कारण आहे. दापोलीत येऊन गोव्याचे आमदार, गुहागर मतदारसंघ आपलाच असल्याचे सांगतात.  हा तुमच्या बापाचा मतदारसंघ आहे काय, असा सवालही कदम यांनी केला. 

हेही वाचा >>> यंदा दूध, दुग्धजन्य पदार्थांची दर स्थिर राहणार? वाचा डेअरी उद्योग अभ्यासकांचं मत काय

गुहागर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासाची मी जबाबदारी घेत आहे. शंभर टक्के विकास होईपर्यंत गप्प बसणार नाही. लोकसभेसाठी सर्वत्र प्रचारासाठी फिरावे लागणार आहे. या मतदारसंघातून तटकरेंना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असे सांगून, सुनील तटकरे आणि मी एकत्र आलो आहोत, यातच समजून जा, असे सांगत विधानसभेसाठी आपण उमेदवार असल्याचे कदम यांनी अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.   शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, डॉ. अनिल जोशी व अन्य पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित होते.