कराड : माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेले आदर्श अन् विकासाच्या दिशेने वाटचाल करू. शेती, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आणि गावगाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

दिवंगत ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला सदाभाऊ खोत यांनी अभिवादन केले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा – अतिवृष्टीमुळे रायगडात पूरस्थिती; नागोठणे, आपटा, खोपोली परिसराला पुराचा तडाखा

हेही वाचा – साताऱ्याची ‘लाडकी बहीण’ ऑनलाईन नोंदणीत सर्वप्रथम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार खोत म्हणाले, यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला. कृषी, सहकार, औद्योगिक विकासाला चालना दिली. त्यांच्या विचारांवर आमची वाटचाल राहिली आहे. आता विधान परिषदेत काम करण्याच्या मिळालेल्या संधीतून सर्व घटकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सदाभाऊंनी या वेळी सांगितले.