“…तर सेवा समाप्तीची कारवाई करू” ; एसटी महामंडळाचा आंदोलक कर्मचाऱ्यांना इशारा!

सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (गुरुवार) एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठक घेत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. तर काही मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करण्यात येईल अस स्पष्ट केल आहे. त्यानंतर एसटी कर्मचारी कृती समितीनेही आंदोलन मागे घेत असल्याच जाहीर केल. मात्र आजही राज्यात अनेक एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. दरम्यान या कर्मचाऱ्यांना आंदोलन असेच सुरू राहील तर सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे. 

विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. राज्यात इतरही ठिकाणी तुरळक का होईना एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील शेगाव डेपो मध्ये एसटी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. या आंदोलनाचा फटका संबंधीत जिल्ह्यात सर्वसामान्यांना बसला असून म्हणावी तेवढी एसटी सेवा राज्यात सुरळित सुरु झालेली नाही. तेव्हा यावर आता कसा तोडगा निघणार, आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीलेलं आहे.

एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतलेले असतांनासुद्धा काही आगारांमध्ये काही कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद होत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात कामकाजात गैरशिस्तपणा, महांडळाची हाणी, जनेतेची गैरसोय, कामबंध करण्याबाबत चिथावणी देणे, कायद्याबाबत तरतूदींचे उल्लंघन करणे, प्रशासकीय आदेशांचा भंग करणे, या आरोपांखाली शिस्त व आवेदन कार्यपद्धती अंतर्गत सेवा समाप्तीच्या कारवाईचा इशारा व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lets take action for termination of service warning to st employees of transport department srk

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या