महाराष्ट्रसह आणि मुंबईच्या हवेतील प्रदूषणाचा स्तर खालावला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना पत्र लिहलं आहे. तसेच, मुंबईतील AQI वर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती आदित्य ठाकरेंनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं की, “राज्यातील पर्यावरण मंत्र्यांची पूर्णवेळ अनुपस्थिती आहे. राज्यात असलेल्या बेकायदेशीर सरकारमध्ये सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव आहे. त्यामुळे हे संकट अधिक बिकट झालं आहे. कारण, याप्रकरणी जमिनीवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.”

हेही वाचा : “भाजपाने फेकलेले तुकडे तोंडात घेऊन…”; बावनकुळेंच्या विधानावरून संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र!

“मुंबई महापालिकेची अभ्यास समिती आणि स्मॉग टॉवर्सची कृती ही केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आहे,” असा घणाघाती आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा : अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी केलं भाष्य; महाविकास आघाडीला लक्ष्य करत म्हणाले…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात प्रदूषित शहरांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमाकांवर पाकिस्तानमधील लाहोर शहराचा समावेश होता. तर, दुसऱ्या स्थानी मुंबई होती. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्सनुसार, २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील हवेतील प्रदुषण हे जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकावर होते. वाहनांचा धूर, रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे हवेतील गुणवत्ता ढासळली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Level of air pollution in maharashtra and mumbai has decreased aaditya thackeray letter central minister bhupinder yadav ssa
First published on: 18-03-2023 at 13:23 IST