शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान उभारण्यास स्थानिक पोलीसांनी हरकत घेतली असून या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांनी हक्क सांगितल्याने पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून ही हरकत घेतली आहे.

हेही वाचा >>> नाशिक : महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर, खडसेंच्या भाषणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

मिरजेतील गणेश विसर्जन मार्गावर स्वागत कमानी उभा करण्याची गेल्या  २५ वर्षाची परंपरा आहे. मुख्य मार्गावर हिंदू एकता आंदोलन, मराठा महासंघ, विश्‍वशांती संघटना, धर्मवीर संभाजी महाराज तरूण मंडळ यांच्या भव्य दिव्य स्वागत कमानी हे मिरजेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.

सलग तीन वर्षानंतर गणेशोत्सव निर्बंध मुक्त वातावरणात साजरा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र, महाराणा प्रताप चौकामध्ये शिवसेनेची स्वागत कमान  उभारण्यात येते. राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने स्थानिक पातळीवरही शिवसेनेत ठाकरे  आणि शिंदे असे  दोन गट निर्माण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही गटांनी महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान  उभारण्यासाठी पोलीस  ठाण्यात ना हरकत दाखला देण्याची मागणी केली होती.

हेही वाचा >>> “सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील १३-१४ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात”, खैरेंच्या दाव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

मात्र, या कमानीच्या जागेवरून दोन गटामध्ये वाद झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होउन उत्सवाच्या काळात  त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो असे नमूद करून शहर पोलीस ठाण्याने हरकत घेतली असल्याचे पोलीस निरीक्षक राजू  सावंत्रे  यांनी मंगळवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. पोलीसांनी हरकत जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या ठिकाणी कोणीही अतिक्रमण करून परिस्थिती हाताबाहेर जाउ नये यासाठी पोलीसांनी जागता पहारा ठेवला असून २४ तास देखरेखीसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे