मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. लोकसभेची निवडणूक पुढच्या महिन्यातल्या १९ तारखेपासून १ जूनपर्यंत चालणार आहे. महराष्ट्रात पाच तर देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळीही सुरु झाली आहे. अशात स्टार प्रचारक म्हणून एकनाथ शिंदे यांनी ४० नावं जाहीर केली आहेत. मात्र यात एक नाव नसल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक?

१) नरेंद्र मोदी
२) अमित शाह<br>३) एकनाथ शिंदे
४) नितीन गडकरी
५) जे. पी. नड्डा
६) रामदास आठवले
७) देवेंद्र फडणवीस
८) अजित पवार<br>९) महादेव जानकर
१०) जोगेंद्र कवाडे
११) रामदास कदम
१२) गजानन किर्तीकर
१३) चंद्रशेखर बावनकुळे
१४) आनंदराव अडसूळ
१५) प्रफुल्ल पटेल
१६) मिलिंद देवरा
१७) गुलाबराव पाटील
१८) नीलम गोऱ्हे
१९) मीना कांबळी
२०) श्रीकांत शिंदे
२१) उदय सामंत
२२) शंभूराज देसाई
२३) दीपक केसरकर
२४) अब्दुल सत्तार<br>२५) तानाजी सावंत
२६) संदिपान भुमरे
२७) दादा भुसे
२८) संजय राठोड
२९) भरत गोगावले
३०) दीपक सावंत
३१) संजय गायकवाड
३२) संजय शिरसाट
३३) शहाजी बापू पाटील
३४) मनिषा कायंदे
३५) नरेश म्हस्के
३६) ज्योती वाघमारे
३७) राहुल लोंढे
३८) कृपाल तुमाणे
३९) आशिष जैस्वाल
४०) किरण पांडव

स्टार प्रचारकांच्या यादीत दिग्गज नावं

ही चाळीस नावं या यादीत आहेत. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक महत्त्वाची नावं या यादीत आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे यात शंकाच नाही. अशात या यादीत एक महत्त्वाचं नाव नाही. त्याचीही चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा- Lok Sabha Election: भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी, मोदी, शाह, फडणवीस यांच्यासह ४० नावं

राहुल शेवाळेंचं नाव यादीत का नाही?

राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत का नाही? याची चर्चा आता रंगली आहे. शिवसेनेच्या लोकसभेतले प्रमुख नेते म्हणजे राहुल शेवाळे. मात्र स्टार प्रचारकांच्या या यादीत त्यांचं नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहे आणि अनेकांच्या यादीमुळे भुवया उंचावल्या आहेत. अशात राहुल शेवाळे यांच्या नावाची वेगळी घोषणा स्टार प्रचारक म्हणून केली जाऊ शकते. मात्र सध्या तरी या यादीत त्यांचं नाव नसल्यानेच विविध चर्चा रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections shiv sena shinde group announces 40 star campaigners of party but this name is not in the list scj
First published on: 27-03-2024 at 18:45 IST