मुलांनो… घरी बसून कंटाळलात? करोनामुळे तुम्हीही त्रस्त झाला असाल ना? मग वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडला असेल. आम्ही आलोय एक भन्नाट आयडिया घेऊन. लोकसत्ता डॉट कॉम आणि ‘युनिसेफ’ ही जागतिक संघटना एकत्र येऊन ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी एक स्पर्धा भरवतोय. ही स्पर्धा आहेच… शिवाय यातून हे चिमुकले जनतेमध्ये जागृतीही करू शकणार आहेत… संदेश पोहोचवू शकणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना वाढतोय आणि लॉकडाउनच्या या काळातही अनेक जण घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यासाठी आणि घरात बसून कंटाळलेल्यांसाठी तुम्ही एकच संदेश द्यायचा आहे.. तो म्हणजे “घरीच राहा, सुरक्षित राहा!” यासाठी चिमुकल्यांनो तुम्ही हव्या त्या माध्यमातून व्यक्त होऊ शकता. चित्र काढा, व्हिडिओ तयार करा, क्राफ्टिंग करा, स्लोगन लिहा काहीही करा. पण त्यातून एकच संदेश जायला हवा… “घरीच राहा, सुरक्षित राहा!”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta dot com and unicef organised competition for kids stay home stay safe
First published on: 18-04-2020 at 12:32 IST