पर्यटक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला. धरणावरील पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

शुक्रवार पासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायकांची प्रतिक्षा संपवली आणि पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. त्यामुळं सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडणार असाल,तर भुशी धरणाचा विचार नक्की करा.

तरुण पर्यटकांना भुरळ घालणारे भुशी डॅम काटोकाट भरल्याने पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे.गेल्या काही दिवसांपासून या क्षणाची पर्यटक वाट पहात होते,विशेष करून या ठिकाणी तरुण आणि तरुणी येत असतात.त्यामुळे या परिसरात जल्लोषाचे वातावरण असते,तरुणाईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने लोणावळ्यातील पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी,मद्यपान आणि छेडछाड करण्याचे प्रकार देखील घडतात.यासाठी गेल्या वर्षी पोलिसांचे विशेष पथक करडी नजर ठेवण्यासाठी नेमले होते.

सेल्फीचा मोह जीवघेणा….
गेल्या आठवड्यात एका पर्यटकाने भुशी डॅम येथे सेल्फीच्या मोहामुळे आपला जीव गमावला आहे. तिरूपती राजाराम उल्लेवाड अस मयत तरुणच नाव होतं.ही घटना ताजी असताना गुरुवारी आणखी एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.त्यामुळे हुल्लडबाजी आणि सेल्फीचा मोह पर्यटकांनी टाळायला हवा जेणेकरून अश्या घटना घडणार नाहीत.