आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीला केवळ एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असला तर राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांसारखे काही पक्ष आहेत जे महायुतीत किंवा महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यापैकीच एक आहे. महादेव जानकरांचा हा पक्ष मागील निवडणुकीत एनडीएबरोबर होता. परंतु, यावेळी मात्र त्यांची भाजपाबरोबर युती झालेली नाही. पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर सध्या पक्षबांधणीसाठी काम करत आहेत. ते रासपच्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फरत आहेत. अशातच त्यांनी आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

महादेव जानकर म्हणाले, हे मोठे पक्ष काय करतात? मोठा मासा लहान माशाला खातो. पण लहान माश्याने लक्षात ठेवलं पाहिजे की आता आपण मोठं व्हायचं आहे. म्हणून रासपने ठरवलंय आता आपण मोठं व्हायचं. सध्या देशात भाजपा आणि काँग्रेस हे दोन मोठे पक्ष आहेत. त्यांच्याबद्दल आपण आत्ताच टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात रासपला सध्या चांगली संधी आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यात रासपसाठी चांगलं वातावरण आहे.

हे ही वाचा >> “यांची निवडून यायची खात्री नाही अन् निघाले…”, विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचा टोला; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानकर यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, आपला पक्ष मोठा झाल्याशिवाय आपल्याला ही मंडळी (भाजपा) जवळ ठेवणार नाही. भाजपाला जेव्हा माझी गरज होती, राजू शेट्टी, रामदास आठवले, विनायक मेटे यांची गरज होती, तेव्हा आम्ही एकत्र आलो. आता त्यांना वाटत असेल की आपल्याला काही यांची गरज नाही. त्यामुळे आपण त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही. त्यामुळे आपण आपली ताकद निर्माण केली पाहिजे. म्हणून जिथे चांगलं आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे.