नगरः महानंदा संस्थेची गोरेगाव येथील जमीन विक्रीबाबत शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत आपण राजकीय संन्यास घेऊ, असे प्रत्युत्तर महसूल तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहे. याबरोबरच संजय राऊत यांच्या विरोधात आपण अब्रुनुकसानीचा दावाही ठोकणार असल्याचे मंत्री विखे यांनी पत्रकारांना सांगितले.

आज, गुरुवारी सकाळी शिवसेनेचे प्रवक्ते राऊत यांनी मुंबईत बोलताना महानंदाच्या गोरेगाव येथील ५० एकर जमीन विक्रीसंदर्भात महसूल मंत्री विखे यांच्यासह मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे चौघेजण या व्यवहारातील ‘सौदागर’ असल्याचा उल्लेख केला होता. त्याला विखे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान
PM Narendra Modi on Supreme court cji letter from lawyers
‘घाबरवणं-धमकावणं ही काँग्रेसची संस्कृती’, सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

हेही वाचा – मूत्रपिंड प्रत्यारोपित तरुणाकडून टांझानियातील ‘किलीमांजरो’ सर, भारतातील एकमेव उदाहरण असण्याची शक्यता

मंत्री विखे आज, नगरमध्ये टंचाई आढावा बैठकीसाठी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दूध डेअरीचे अध्यक्ष राजेश परजणे हे मंत्री विखे यांचे मेहुणे आहेत. ही संस्था राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ही संस्था गुजरातमध्ये स्थलांतरित केली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

महानंदाचे अध्यक्ष कोण होते? राधाकृष्ण विखे यांचे सख्खे मेहुणे. ‘मेहुणे, मेहुणे सख्खे पाहुणे आणि पाहुण्यांना दिले महानंदा’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले की, संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, हे मी पूर्वीच सांगितले आहे. राऊत यांनी केलेली बेताल वक्तव्ये सिद्ध करून दाखवावीत. मी राजकीय संन्यास घेईल. त्यांच्या या बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावाही दाखल करणार आहे. राऊत ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करतात त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याविषयी सुपारीबहाद्दर, पिसाळलेले कुत्र्यासारखे भुंकणारे अशी भाषा वापरावी का, असाही प्रश्न मंत्री विखे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचे निधन

सवंग लोकप्रियतेसाठी बेताल वक्तव्य करत आहेत, पत्रकारांनी त्यांचे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेऊ नये, राऊत असेच बेताल वक्तव्य करत राहिले तर त्यांनी किती जणांची घरे फोडली हे आम्हाला पाहावे लागेल, असेही मंत्री विखे म्हणाले.