राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के इतका लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल ०.८२ टक्क्यांनी कमी लागला आहे. कोकण विभागाने ९६.१८ टक्क्यांसह निकालात बाजी मारली आहे. यंदाही मुलींनीच अव्वल स्थान पटकावले आहे. ९१. ४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८६.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. २४ तारखेला दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे.
येथे पाहा निकाल…
http://www.mahresult.nic.in
http://www.maharashtraeducation.com
http://www.sscresult.mkcl.org
http://www.rediff.com/exams
knowyourresult.com
निकाल पाहण्यासाठी
बीएसएनएल मोबाईलवरून mhssc (स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा.
आयडीया, व्होडाफोन, टाटा डोकोमो, रिलायन्स, बीएसएनएल टेलेनॉर या कंपन्यांच्या मोबाईलवरून MAH10 (स्पेस) (परीक्षा क्रमांक) असा एसएमएस ५८८८८१११ या क्रमांकावर पाठवावा.
दहावी परीक्षेचा निकाल साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. गेल्यावर्षी (२०१६) ६ जून रोजी, २०१५ मध्ये ८ जूनला निकाल जाहीर झाला होता. मात्र, यंदा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. त्यात भर म्हणून सोशल मीडियावर रोज नव्याने जाहीर होणाऱ्या निकालाच्या तारखांनी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. आज अखेर दहावीचा निकाल जाहीर झाला. यंदा निकालाचा टक्का ०.८२ ने घसरला आहे. राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला. तर कोकणचा सर्वाधिक ९६.१८ टक्के निकाल लागला असून, अव्वल स्थान पटकावले आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण- ९६.१८
कोल्हापूर – ९३.५९
पुणे – ९१.९५
मुंबई – ९०.०९
औरंगाबाद – ८८.१५
नाशिक – ८७.७६
लातूर – ८५.२२
अमरावती – ८४.९९
नागपूर – ८३.६७
LIVE UPDATES:
*’सैराट’फेम रिंकू राजगुरुला दहावीला ‘फर्स्ट क्लास’
*दहावीचे ऑनलाईन निकाल जाहीर होण्यास सुरुवात
* १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
*१५३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के
*अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८५.७२ टक्के, १८ जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार
*९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे ४८ हजार ४७० विद्यार्थी
*राज्यात ३ हजार ६७६ शाळांचा निकाल १०० टक्के, ३२ शाळांचा दहावीचा निकाल शून्य
*मुलींची निकालात बाजी
*राज्याचा दहावीचा निकाल ८८.७४%, कोकणचा ९६.१८%
* दहावी निकालाबाबत माहिती देण्यासाठी थोड्याच वेळात राज्य मंडळाची पत्रकार परिषद
*विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता
* दहावीचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार