मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (६ जून रोजी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकमीध्ये शिक्षण, शेती, पाणी पुरवठा या क्षेत्राशी निगडीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करुन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांसह जाणून घ्या आजच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले.

>>>> नाशिक जिल्ह्यातील मौजे काष्टी (ता. मालेगांव) येथे कृषि विज्ञान संकुलांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार. (कृषि विभाग)

Supreme Court Asks If Voters Can Get VVPAT Slip
निवडणुकीचे पावित्र्य टिकावे; सर्वोच्च न्यायालयाचे मत, सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
Bhaskar Bhagre and Bharti Pawar
दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांविरोधात मविआकडून शिक्षक मैदानात

>>>> मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करुन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय. (कृषि विभाग)

>>>> ख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)

>>>> ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)

>>>> पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या, पाणी पुरवठा योजनांच्या निविदेत भावभिन्नता कलमाचा (Price Variation Clause) समावेश करणे व सध्याच्या अप्रत्याशीत / असाधारण भाववाढीसाठी विशेष सवलत (Special Relief) देण्याचा निर्णय. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)

>>>> सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथील नॅशनल सहकारी सूतगिरणी या सहकारी सूतगिरणीची शासन अर्थसहाय्यासाठी निवड. (वस्त्रोद्योग विभाग)