महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- २०२० स्कॅन उत्तरपत्रिका तसेच गुणपत्रकाबाबत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

यासंदर्भात आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २७ मार्च २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० करीता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https:// mpsc.gov.in या संकेतस्थळवरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेबलिंकद्वारे या संकेटस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या लिंकवर क्लिक करावे. उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणार ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे. लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल.

उपरोक्त विहित कार्यपद्धतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा supportoniline@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.

उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध राहील. असे कळवण्यात आले आहे.