मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि बेस्ट बस कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या निर्णयाचा मुंबई महापालिकेच्या ९३ हजार तर बेस्टच्या २९ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

अतिवृष्टीग्रस्तांना साडेचार हजार कोटींची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती; राज्यात २० हजार पोलिसांची भरती होणार

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. “करोनाच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे, त्यासोबतच चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहनदेखील दिले पाहिजे”, असे या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेबांचा आवाज, हिंदवी तोफ अन्…; CM शिंदेंनी शेअर केला स्वत:चा ‘एकलव्य’ असा उल्लेख ‘शिवसेना दसरा मेळाव्याचा’ टीझर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ‘श्रमसाफल्य’ आणि ‘आश्रय’ या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांना सोबत घेऊन अशी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावीत, यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.