मागच्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. खरंतर करोनाचे रूग्ण कमी झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र शनिवारी राज्यात ४३७ नवे करोना बाधित आढळले आहेत. तसंच दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात सक्रिय रूग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या १९५६ सक्रिय रूग्ण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी राज्यात ४३७ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनाचे सर्वाधिक रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात ५७१ करोना रूग्ण सध्याच्या घडीला आहेत. तर त्यानंतर मुंबई आणि ठाण्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात शनिवारी करोनामुळे दोन रूग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra corona update 437 corona patients registered and two people died scj
First published on: 26-03-2023 at 07:57 IST