मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील अनेक शहरांत करोना बळावू लागला आहे. अनेक जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, महाविद्यालयांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुद्द्यांवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महाविद्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून घ्यावा. तसे निर्देश देण्यात आले असल्याची महत्वाची माहिती सामंत यांनी आज दिली.

आणखी वाचा- माझं कळकळीचं आवाहन की,…; राजेश टोपे यांचं रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र

करोनाचा प्रसार वाढला असून, राज्य सरकारबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील पुणे, नागपूर, अमरावतीसह काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये सुरू ठेवणार की बंद करणार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महाविद्यालये आणि परीक्षांचं काय होणार अशीही चर्चा केली जात असून, त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा- मुंबई, पुण्यानंतर आता नागपुरातही निर्बंध लागू; शाळा, लग्नाचे हॉल बंद राहणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“करोनाचे रुग्ण वाढत असतली. कंटेनमेंट झोन होणार असतील. तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्यांना जिल्ह्याची परिस्थिती माहिती असते. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल किंवा त्याचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसणार असेल, तर कुलगुरुंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि महाविद्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय दोघांनी घ्यावा,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.