करोनाला हरवण्यासाठा तिसरा लॉकडाउन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी राज्य सरकारनं जारी केल्याचं टि्वट एएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे. त्यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आता कुरिअर सेवा सुरू होईल, पोस्ट सुरू होतील, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सुरू होतील तसेच काही ठिकाणी खासगी व सरकारी कार्यालयेही सुरू होतील. विशेष म्हणजे, काही ठिकाणी आंतरजिल्हा बसेसही सुरू होणार आहेत. झोननुसार कोणत्या जिल्ह्यात काय सुरू होणार याची संपूर्ण यादी एकदा वाचा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय सुरू राहील आणि काय बंद राहील ?

ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये असलेली खासगी आणि सरकारी कार्यालये सुरू होतील. मात्र, रेड झोनमध्ये असलेली ही कार्यालये केवळ 33 टक्के सुरू करावी लागतील. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या अशा कार्यालयांना कोणतीही मुभा नाही. तेथील कोणतीही कार्यालये सुरू होणार नाहीत.

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारनं आता रेडझोनमधील दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहेत. त्यात दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण, रेड झोनमध्ये असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांसाठी ही सूट लागू नसेल. तेथील दुकाने सध्या उघडता येणार नाहीत.

या गोष्टी राहणार बंदच
विमान, ट्रेन, मेट्रो किंवा आंतरराज्य रस्ते वाहतूक यांना बंदी कायम असेल. शिवाय कोणत्याही शैक्षणिक संस्था सुरू नसतील. याशिवाय कोणतेही हॉटेल्स सुरू ठेवता येणार नाहीत.. तसेच कोणत्याही प्रकारच्या सभा-संमेलनं घेता येणार नाहीत आणि धार्मिक स्थळंही सुरू ठेवता येणार नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government issued list of activities that will allowed and not allowed different zones covid19 lockdown pkd
First published on: 03-05-2020 at 16:47 IST