MSBSHSE Maharashtra Board HSC 12th Class Result 2025 Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी बहुप्रतिक्षित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल सोमवारी (५ मे) जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results आणि results.digilocker.gov.in या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन निकाल पाहता येतील. तर, महाविद्यालयांना आवश्यक कॉलेज लॉग-इनसह mahahsscboard.in वर एकत्रित निकाल पाहता येतील.
थेट निकाल पाहाण्यासाठी इथे क्लिक करा…
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचे निकाल जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध प्रवेश परीक्षांसह उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून, महाराष्ट्र राज्य मंडळाने नेहमीपेक्षा लवकर बारावीच्या परीक्षा सुरू केल्या होत्या. त्यामुळे या परीक्षेचा निकालही लवकर लावण्यात येत आहे.
मुद्दे | तपशील |
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा २०२५ |
निकाल | महाराष्ट्र HSC निकाल २०२५ |
परीक्षा आयोजित करणारी संस्था | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) |
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ | mahresult.nic.in |
लॉग इनसाठी आवश्यक तपशील | परीक्षा क्रमांक आणि आईचे पहिले नाव |
महाराष्ट्र HSC निकालाची तारीख | ५ मे २०२५, दुपारी १ नंतर |
एकूण विद्यार्थ्यांची संख्या | सुमारे १५ लाख विद्यार्थी |
निकाल स्थिती | जाहीर होणे बाकी आहे |
Maharashtra Class 12th Result Live Updates 5 May 2025: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स
Maharashtra HSC 12th Board Result 2025 : १२ वी उत्तीर्ण, आता पुढे काय करायचं? वाचा, करिअरच्या 'या' नव्या चांगल्या संधी
MAHA HSC Result 2025 Maharashtra Live Updates: बारावीच्या परीक्षेचा शाखानिहाय निकाल
आज जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात राज्यात विज्ञान शाखेत सर्वाधिक ९७.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर वाणिज्य शाखेतून ९२.६८ टक्के, व्यावसायिक शाखेतून ८३.२६ टक्के आणि कला शाखेतून ८०.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
MAHA HSC Result 2025 Maharashtra Live Updates: बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीची ३६६
यावर्षी मार्च २०२५ मध्ये झालेल्या १२ वीच्या परीक्षेमध्ये १२४ केंद्रावर कॉपीची प्रकरणे आढळली आहेत. ज्या केंद्रांवर ही प्रकरणी आढळली त्याची चौकशी करून ही केंद्रे पुढील परीक्षेपासून कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. परीक्षेच्या कालावधीत १२४ केंद्रांवर ३६६ कॉपी केसेस समोर आल्या, तर या सर्व केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करणार असल्याचे महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं.
आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालानंतर, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असूनही त्यांना श्रेणीसुधार करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना येत्या तीन परीक्षा, अर्थात जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६ या तिन्ही वेळी किंवा त्यापैकी एका परीक्षेला बसण्याची संधी असेल.
या परीक्षांमध्ये बसल्यानंतर विद्यार्थ्याचे गुण वाढल्यास किंवा कमी झाल्यास आधीची गुणपत्रिका कायम ठेवायची की नव्याने उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका कायम ठेवायची, हे ठरवण्याचा अधिकार विद्यार्थ्याला असेल. त्यासाठी विद्यार्थ्याला सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. यानंतर दुसरी गुणपत्रिका विद्यार्थ्याने मंडळाकडे परत द्यायची आहे, असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जुलै २०२४ पासून हे बदल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र बोर्डाच्या खालीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा– mahahsscboard.in, mahresult.nic.in, mahahsscboard.org, hscresult.mkcl.org, education.indianexpress.com आणि results.digilocker.gov.in.
होमपेजवर ‘महाराष्ट्र बारावी निकाल २०२५’ लिंकवर क्लिक करा
दिलेल्या पर्यायांमध्ये परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव भरा
आता, महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल २०२५ पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी व्ह्यू रिझल्ट पर्यायावर क्लिक करा.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान आता विद्यार्थ्यांसाठी निकालाची लिंक आता अॅक्टीव्हेट झाली आहे. आता विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ७५ आणि त्याहून अधिक टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,४९,९३२ इतकी आहे. ६० ते ७४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४,०७,४३८ इतकी आहे. तर ४५ ते ५९.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५८०९०२ इतकी आहे.
महाराष्ट्र बारावी २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
HSC Result 2025 Maharashtra Live Updates: निकाल पडताळणीच्या तारखा जाहीर
आज जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी करण्यासाठी २० मे पर्यंत वेळ आहे. बारावी निकाल २०२५ च्या पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करावा लागेल.
HSC Result 2025 Maharashtra Live Updates: एकनाथ शिंदे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या एच.एस.सी. अर्थात बारावी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तमाम विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि भावी शैक्षणिक वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा!" https://twitter.com/mieknathshinde/status/1919279154303807973 बारावीचा निकाल थेट पाहाण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदाही अधिक आहे. दरम्यान हा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. आपल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा."
https://twitter.com/supriya_sule/status/1919273894952722463 बारावीचा निकाल थेट पाहाण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. या पत्रकार परिषदेत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २०२७-२८ मध्ये दहावी-बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे पुढील परीक्षा त्यानुसार घेतल्या जातील.
महाराष्ट्र बोर्डाने आज जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात राज्यातील एकूण १०,४९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यापैकी ३८ महाविद्यालयांतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.
HSC Result 2025 Maharashtra Live Updates: राज्यातील सुमारे २ हजार महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १०,४९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १,९२९ महाविद्यालयांतील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
HSC Result 2025 Maharashtra Live Updates: पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ३७.६५ टक्के
गेल्यावेळी बारावीच्या परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या एकूण ४२,३८८ विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी केली होती. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजेच उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ टक्के आहे.
HSC Result 2025 Maharashtra Live Updates: यंदा एकाही विद्यार्थ्याला नाहीत १०० टक्के गुण
महाराष्ट्र बारावीच्या बारावीच्या निकालात एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत. तब्बल ४,५०० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
HSC Result 2025 Maharashtra Live Updates: गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी २० मे पर्यंत मुदत
गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना २० मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी वेगळे शुल्क भरून मिळाल्याशिवाय विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकणार नाहीत.
HSC Result 2025: दुपारी १ पासून पाहता येणार बारावीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. मंडळाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती देण्यात येणार आली. आज दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
HSC Result 2025: बारावीच्या परीक्षेत २० हजार विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत. क्रीडा किंवा स्काउट आणि गाईड उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत.
या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १५४ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी ३७ विषयांमध्ये १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Maharashtra HSC 12th Result 2025: बारावीचा निकाल लागला, पुढे काय? कसा कराल श्रेणी सुधार किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज?
Maharashtra HSC Result 2025 Marksheet: बारावीचा निकाल लागला! तुमची गुणपत्रिका, ई-मार्कशीट आणि प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे, जाणून घ्या सोपी पद्धत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५ टक्के इतका लागला आहे.
शाखांनुसार बारावीचा निकाल खालीलप्रमाणे;
विज्ञान: ९७.३५%
कला: ८०.५३%
वाणिज्य: ९२.६८%
व्यावसायिक: ८३.३%
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षांच्या बारावीच्या निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
२०२५: ९१.८८ टक्के
२०२४: ९३.३७ टक्के
२०२३: ९१.२५ टक्के
२०२२: ९४.२२ टक्के
२०२१: ९९.६३ टक्के
बारावीच्या परीक्षेत दीड लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. नोंदणी केलेल्या १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांपैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील १ लाख ४९ हजार ९३२ विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा ९७.३५ टक्के, कला शाखेचा ८०.५२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.६८ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८३.२६ टक्के, आयटीआयचा निकाल ८२.०३ टक्के लागला.
HSC Result 2025: गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल यंदा सुमारे दीड टक्क्याने घटला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, त्यानुसार यंदा ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दीड टक्क्याने निकाल घटला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.७४ टक्के, लातूर विभागाचा सर्वांत कमी ८९.४६ टक्के निकाल लागला आहे. याचबरोबर यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
HSC Result 2025: बारावीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. विभागनिहाय निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे;
पुणे - ९१.३२
नागपूर - ९०. ५२
छत्रपती संभाजीनगर - ९२.२४
मुंबई -९२.९३
कोल्हापूर - ९३.६४
अमरावती - ९१.४३
नाशिक - ९१.३१
लातूर - ८९.४६
कोकण - ९६.७४
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ इतकी आहे. तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ इतकी आहे. दरम्यान आजच्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका लागला आहे.
HSC Result 2025: लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेल्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका लागला आहे.
HSC Result 2025: कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेल्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुलींसह १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. (Express File Photo)