मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर काही पुरातन कातळशिल्पं आढळून आली. अभ्यासक सतीश लळीत यांनी ह्या कातळशिल्पांचा शोध लावला. आढळलेल्या या कातळशिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, यांचा समावेश आहे. मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.

या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, आणि मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोतला बिबट्या तुम्ही शोधू शकता का? बघा प्रयत्न करून)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: Video: मध्य प्रदेशात अस्वलाच्या हल्ल्यात नवरा-बायकोचा मृत्यू; मृतदेहावर बसून तोडले लचके)

या सर्व परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी ‘पांडवांची चित्रे’ नष्ट झाली असे स्थानिकांनी सांगितले.  सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत.