यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकवणाऱ्या कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरवर मात करत मानाची गदा तर पटकावली. मात्र त्याला बक्षिसाची रक्कम दिली गेली नसल्याचे समोर आले आहे. शिवाय, यामुळे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

काल स्पर्धा जिंकल्यानंतर साताऱ्यात पृथ्वीराजची जल्लोषात मिरवणूक निघाली, कोडकौतुक झालं. मानाची गदा आणि चषकही मिळाला. परंतू रोख रकमेचं बक्षीस न दिल्याने त्याची निराशा झाली आहे.

PHOTOS : अंतिम क्षणापर्यंत रंगला महाराष्ट्र केसरी-२०२२ चा थरार; कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील ठरला मानकरी!

महाराष्ट्रा केसरी स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत स्पर्धा जिंकणाऱ्या मल्लाला आयोजन समितीकडून रोख रक्कमेचं बक्षीस दिलं जातं. करोनामुळे दोन वर्ष स्पर्धा बंद असल्यामुळे मल्लांचा सराव सुटला होता. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर साताऱ्यात या स्पर्धेने दमदार कमबॅक केलं. परंतू विजेतेपद मिळाल्यानंतरही रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्यामुळे अखेरीस या स्पर्धेच्या आयोजनाला गालबोट लागल्याचं दिसत आहे.

Maharashtra Kesari 2022 : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी!

या प्रकाराबद्दल प्रसिद्ध मल्ल सोनबा गोंगाणे यांनी आवाज उठवत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब घरातून येत असतात. त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी गदेसोबत रोख रक्कमही मिळणं गरजेचं असल्याचं सोनबा गोंगाणे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने कळवूनही आयोजन समितीकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Kesari 2022 : तब्बल २१ वर्षांनंतर कोल्हापूरला मिळाली ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा!

यासंदर्भात सातारा तालीम संघाचे आयोजक सुधीर पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर थेट भाष्य न करता प्रकरण सावरुन घेण्याचा प्रयत्न केला. “महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद प्रशासन व आयोजक म्हणून आम्ही स्पर्धेदरम्यान पैलवानांना चांगली सुविधा दिली. महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान पृथ्वीराज पाटील यांना मानाची गदा टायटल सन्मानार्थ दिला गेला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेशी आपण बोलणार आहोत.” असं ते म्हणाले. मात्र पृथ्वीराज पाटीलने व्यक्त केलेल्या खंत बाबत बोलण्यास सुधीर पवार यांनी नकार दिला.
सातारा तालीम संघाचे दीपक पवार यांनी तांत्रिक कारण देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्या स्पर्धकाला बक्षीसाची रक्कम आम्ही संयोजक म्हणून द्यायची असं यजमानपद घेताना ठरलं नव्हतं. आम्हाला पृथ्वीराज पाटीलला ५१ हजाराचं बक्षीस देण्यास काहीच अडचण नव्हती अशी प्रतिक्रीया संयोजक दीपक पवार यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पृथ्वीराजला जाहीर झालेली मदत –

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला आमदार शिवेंद्रसिंहराजेंकडून पाच लाखांचे बक्षीस, उदयनराजे मित्र समूहाच्या प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघाकडून बुलेट, सुशीलदादा मोझर यांच्याकडून एक लाख ५१ हजार रुपये, पैलवान कै.संजय पाटील कुटुंबियांकडून एक लाख रुपयांच बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या कै. शिवाजीराव चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने दोन लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.