Maharashtra Monsoon Session 2025 Highlights: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती काय आता तुम्हाला विचारुन करायची का? असा सवाल माध्यमांना केला आहे. तसंच एक पोस्ट लिहून चांगलीच टीकाही केली आहे. मी जे बोललो नाही ती वाक्यं माझ्या तोंडी घातली गेली आणि बातम्या केल्या गेल्या ही पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे. दुसरीकडे मनसेचे नेते प्रकाश महाजन नाराज आहेत. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेंची मुलाखत येत्या १९ आणि २० जुलैला होणार आहे. या मुलाखतीत राज बरोबर आहेच असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर पावसाळी अधिवेशनाचा आजचा १७ वा दिवस आहे. अधिवेशानत काय होतं याकडेही आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Latest Maharashtra News Live Today | "युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का?"; राज ठाकरे कुणावर संतापले? यासह महत्त्वाच्या घडामोडी

20:28 (IST) 16 Jul 2025

मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे यांच्याकडून विधिमंडळात खोटी माहिती - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा आरोप

माझ्यावर झालेल्या सरकारपुरस्कृत हल्ल्याचा निषेध करणार नाही. मात्र, ब्रिगेड जशास तसे उत्तर देणार आहे,’ असे प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केले. ...सविस्तर बातमी
20:28 (IST) 16 Jul 2025

भाजप खासदार निशिकांत दुबेंना मनसेची नोटीस

दुबे यांनी जाहीर लेखी माफी न मागितल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
20:15 (IST) 16 Jul 2025

आंदोलक कमी, पोलीस अधिक; रोजंदारी कर्मचारी आंदोलनाचा आठवा दिवस

आंदोलकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आदिवासी विकास भवनाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...वाचा सविस्तर
20:05 (IST) 16 Jul 2025

‘विकसित भारत २०४७’साठी शिक्षणात होणार ‘हे’ बदल...

राज्यातील सरकारी शाळांमधील अव्यवस्था, अडचणी, खालावलेल्या शैक्षणिक कामगिरीची कबुली देत राज्याच्या शिक्षण विभागाने विकसित भारत २०४७साठी शालेय शिक्षणाचा पथदर्शी आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) तयार केला आहे. ...सविस्तर बातमी
19:53 (IST) 16 Jul 2025

शाळांच्या मनमानी शुल्कवाढीवर निर्बंध; इंटिग्रेटेड महाविद्यालयांसाठी नवा कायदा, शिक्षणमंत्री भूसे यांची घोषणा

राज्यातील शाळांमध्ये विविध मार्गांने बेकायदेशीर शुल्कवाढ करुन विद्यार्थांची पिळवणूक केली जात असून या बेकायदेशीर शुल्कवाढीवर नियंत्रणासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. ...अधिक वाचा
19:44 (IST) 16 Jul 2025

नाशिक : पाणी टंचाईमुळे रहिवाशांचे आंदोलन

रहिवाशांना भेडसावणाऱ्या कृत्रिम पाणी टंचाईच्या समस्येला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...सविस्तर वाचा
19:06 (IST) 16 Jul 2025

आंजर्ले व केळशी समुद्र किनारी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने दापोलीत खळबळ

दापोली पोलीस स्थानक हद्दीतील आंजर्ले व केळशी समुद्र किनारी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान सापडल्याने मोठी खळबळ उडाली. ...अधिक वाचा
17:08 (IST) 16 Jul 2025

भाजपचे गोडवे, शिंदे गटातील त्रुटींवर बोट; हेमंत गोडसे यांच्या मनात आहे तरी काय ?

ठाकरे गटाला सुरुंग लावताना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. या स्थितीला वैतागून माजी खासदार गोडसे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...अधिक वाचा
16:35 (IST) 16 Jul 2025

टेस्लाचे देशातील पहिले शो रूम मुंबईत, राज्य सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनमधून आयात केलेल्या टेस्लाला टोलमाफी

प्रसिद्ध टेस्ला कंपनीच्या मोटारगाड्यांची चीनमधून आयात करण्यात येत असून, देशातील पहिले टेस्ला शो रूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू करण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
16:35 (IST) 16 Jul 2025

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; परिचारकाला अटक

नाशिकच्या एका संस्थेत परिचारिका अर्थात नर्सिंगचे शिक्षण घेणारी १६ वर्षीय पीडित विद्यार्थिनी येथील स्टेट बँक परिसरातील एका नामांकित रुग्णालयात कामाचा अनुभव म्हणून १९ जूनपासून कार्यरत होती. ...वाचा सविस्तर
15:10 (IST) 16 Jul 2025

हिरे पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाचा जामिनास नकार

२५ शिक्षकांची व्यंकटेश बँकेत बोगस कर्ज प्रकरणे करून ही रक्कम परस्पर लाटण्यात आल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल आहे. ...वाचा सविस्तर
14:28 (IST) 16 Jul 2025

समृद्धी महामार्ग संपल्यावर भिवंडीजवळील चौफुलीवर कोंडीचे दुखणे; निमा पदाधिकाऱ्यांचे नितीन गडकरींना साकडे

आठपदरी समृद्धी महामार्गावरून भरधाव येणारे वाहनधारक चारपदरी मुंबई-आग्रा महामार्गावर आमणे येथे पोहोचल्यावर कोंडीत अडकतात. कारण, महामार्गावरील आणि समृद्धी महामार्गावरील वाहने या ठिकाणी एकत्र येतात. ...सविस्तर बातमी
13:23 (IST) 16 Jul 2025

पालघर : शहरातील सर्वच मुख्य रस्ते खड्ड्यात, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना त्रास

पावसाळा सुरू झाल्यापासून पालघर शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...सविस्तर वाचा
12:20 (IST) 16 Jul 2025

संयुक्त राष्ट्रातही लवकरच जागतिक ग्राहक तंटा निवारण यंत्रणा, मुंबई ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्याला यश

संयुक्त राष्ट्र संघाच्या २०१९ मध्ये झालेल्या वार्षिक परिषदेत मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. ...अधिक वाचा
12:16 (IST) 16 Jul 2025

हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड पहिल्यांदाच माध्यमांसमोर, 'त्या' दिवशी काय घडलं याची माहिती देत म्हणाले…

Sambhaji Brigade Praveen Gaikwad : प्रवीण गायकवाड म्हणाले, "ज्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो तिथे कोणीही या घटनेचा निषेध नोंदवला नाही, आयोजकांनी पोलिसांत तक्रार देखील केली नाही." ...वाचा सविस्तर
12:03 (IST) 16 Jul 2025

संप करावा की करू नये… मुंबई महापालिकेच्या सफाई खात्यातील कामगारांचा आज निर्णय

घरोघरी गोळा केलेला कचरा जमा करण्यासाठी सेवाधारित कंत्राट देण्याचे मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने ठरवले आहे.

सविस्तर वाचा...

11:49 (IST) 16 Jul 2025

जळगाव जिल्हा प्रशासनाला मतदान यंत्रे प्राप्त; स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तयारी

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार वाढीव मतदान यंत्रांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. ...अधिक वाचा
11:45 (IST) 16 Jul 2025

बैलगाडा शर्यतींविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : राज्यातील बैलगाडा शर्यतींच्या आधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात, असा दावा करून बैलगाडा शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मगळवारी फेटाळली.

सविस्तर वाचा...

11:44 (IST) 16 Jul 2025

सावरकरांना दुर्लक्षित न करण्याचे आदेश राहुल गांधींना देण्याची मागणी, याचिका ऐकण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह त्यांचे कार्य दुर्लक्षित न करण्याचे आदेश लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना देण्याची मागणी करणारी जनहित याचिका ऐकण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

सविस्तर वाचा...

11:43 (IST) 16 Jul 2025

शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे शाळांच्या स्वातंत्र्यावर गदा?

पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शालेय स्तरावर अंमलबजावणी करताना परीक्षेसंदर्भातील निर्णय राज्यस्तरावरूनच घेतला जाणार असल्याचे दिसून येत आहे. शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक प्राथमिक-माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक यांच्या सल्ल्याने निश्चित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले असून, या निर्णयामुळे शाळांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा...

11:41 (IST) 16 Jul 2025

ससून रुग्णालयात तोडफोड

पुणे : ससून रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घालून तोडफोड करणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी प्रवेशद्वाराची काच फोडून ईसीजी यंत्राची तोडफोड केली, तसेच सुरक्षारक्षकाला धमकावून धक्काबुक्की केली.

सविस्तर वाचा....

11:40 (IST) 16 Jul 2025

ओला, उबर कारचालकांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरूच… बुधवारी प्रवाशांनी धरली रिक्षाची वाट

ठाणे : ओला, उबर, रॅपिडोचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा तसेच बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी ओला, उबर, रॅपिडो कारचालकांनी संपूर्ण राज्यात मंगळवारपासून संप पुकारला आहे. मागण्या मान्य होत नसल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारीही ओला, उबर, रॅपिडो चालकांचा संप सुरू आहे. या संपात रिक्षाचालक सहभागी झालेले नाहीत. यामुळे ओला, उबर ॲपवर रिक्षा उपलब्ध होत असल्याने कामावर जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी रिक्षाचा आधार घेतला.

सविस्तर वाचा...

11:39 (IST) 16 Jul 2025

ग्रंथालय अनुदान व्यवस्थापनासाठी डिजिटल ज्ञानवर्धनावर कार्यशाळा

ठाणे – ग्रंथालय व्यवस्थापनातील नविन पद्धती, ग्रंथालय अनुदान निगराणी प्रणाली, तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अनुषंगाने असलेल्या कायद्यांबाबत ग्रंथालयांना विस्तृत माहिती मिळावी या उद्देशाने ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने ठाण्यात ग्रंथालय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवारी, १६ जुलैला सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोरील मराठी ग्रंथ संग्रहालयात होणार आहे.

सविस्तर वाचा....

11:24 (IST) 16 Jul 2025

मुले पळवणारी टोळी सक्रीय झाल्याची अफवा

काही लोक फिरत असून ते लहान मुलांना विविध आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न करत असल्याची अफवा पसरली आहे. ...सविस्तर वाचा
11:04 (IST) 16 Jul 2025

युतीच्या चर्चा तुमच्याशी बोलून करायच्या का? कुणावर संतापले राज ठाकरे?

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचे वारे वाहात आहेत. तसेच उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसून आले. परंतु राज ठाकरेंनी अद्यापतरी युतीबाबत सावध पवित्रा घेतल्याचा पाहायला मिळतंय. विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असं राज ठाकरेंनी अनौपचारिक बोलताना सांगितले. त्यानंतर आज सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंनी या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच युतीच्या चर्चा तुमच्याशी बोलून करायच्या का? असा सवाल माध्यमांना केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती काय आता तुम्हाला विचारुन करायची का? असा सवाल माध्यमांना केला आहे. तसंच एक पोस्ट लिहून चांगलीच टीकाही केली आहे. मी जे बोललो नाही ती वाक्यं माझ्या तोंडी घातली गेली आणि बातम्या केल्या गेल्या ही पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे.

Raj Thackeray news in marathi

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे