Mumbai Marathi News Live Updates : महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. अशातच काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात कितीजण मृत्यूमुखी पडले? त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की चेंगराचेंगरीत? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारले. तसेच त्यांनी एक व्हिडीओसुद्धा ट्वीट केला. दरम्यान, यावरून आज पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

याबरोबरच गेल्या काही दिवसांत राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. मात्र, आता बहुतांश भागात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांच्यावर गेलं आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

maharashtra state electricity workers federation marathi news
‘वीज कर्मचाऱ्यांचे अत्यावश्यक सेवेच्या नावावर शोषण…’
Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

याशिवाय राज्यातील इतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्यांवर आपलं लक्ष असेल.

Live Updates

Mumbai Pune  News Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ४३४ अनधिकृत होर्डिंग, धोरणाची अंमलबजावणी प्रलंबित

 
17:15 (IST) 19 Apr 2023
ठाणे कोंडले; साकेत, खारेगाव खाडी पूलाच्या दुरुस्ती कामांचा परिणाम

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूकीच्या दृष्टिने अंत्यत महत्त्वाच्या असलेल्या खारेगाव आणि साकेत पूलाच्या दुरुस्ती कामास बुधवारपासून सुरुवात झाली. या दुरुस्ती कामाचा पहिल्याच दिवशी परिणाम जाणवला.

सविस्तर वाचा...

16:52 (IST) 19 Apr 2023
कळव्यातील मफतलाल कंपनीच्या जागेवर पुन्हा झोपड्यांची उभारणी; महापालिका अतिक्रमण निष्काषन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ठाणे : महापालिका क्षेत्रातील विविध भागात बेकायदा इमारती उभ्या राहत असल्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून गाजत असतानाच, त्यापाठोपाठ आता कळवा येथील मफतलाल कंपनीच्या जागेवर भुमाफियांकडून झोपड्या उभारण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे.

सविस्तर वाचा...

15:56 (IST) 19 Apr 2023
दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत चार टक्के आरक्षण, मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांची माहिती

दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

15:02 (IST) 19 Apr 2023
राज्यात बहुतांश ठिकाणी पारा चाळीशीपार; कर्जतमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बघायला मिळाला. मात्र, आता पुन्हा एकदा तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा ४० अशांच्या पार गेला आहे मंगळवारी कर्जतमध्ये ४५ अंश सेल्सिअस सह सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तर मुरबाडमध्येही ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भात तापमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपुरात मंगळवारी ४३ अंश सेल्सिअससह सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

14:44 (IST) 19 Apr 2023
अमरावती : परसबागेतील वेल शेळीने खाल्‍ल्‍याच्या वादातून हत्‍या; मारेकऱ्याला जन्मठेप

अमरावती : परसबागेत लावलेले वेल शेळीने‎ खाल्ल्याच्या वादातून एकाने वृद्ध‎ शेजारी शेळी मालकावर कुऱ्हाडीने‎ वार करून त्याची हत्‍या केली. ही‎ घटना सात वर्षांपूर्वी वलगाव‎ ठाण्याच्या हद्दीतील विर्शी गावात‎ घडली. या प्रकरणी येथील जिल्हा‎ न्यायाधीश (क्रमांक २) पी.जे.‎ मोडक यांच्या न्यायालयाने‎ आरोपीला आजन्म कारावासाची‎ शिक्षा सुनावली आहे.

सविस्तर वाचा..

14:44 (IST) 19 Apr 2023
चंद्रपूर महापालिकेचा नाली सफाईवर वर्षाला १८ कोटींचा खर्च

चंद्रपूर : शहरातील १७ प्रभागांतील नाल्यांची साफसफाई आणि गाळ उचलण्यासाठी महापालिकेने थेट अमरावती येथून कंत्राटदार आयात केला आहे. तीन वर्षांसाठी १८ कोटी रुपयांना कंत्राट दिले असले तरी सर्वत्र घाणीचे साम्राज्य, साफ सफाई अभावी सर्व प्रभागांतील नाल्या तुडूंब भरलेल्या, गाळ साचलेल्या आणि सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य आहे. महापालिकेतील माजी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या भागिदारीतून ही सर्व कामे सुरू असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे.

सविस्तर वाचा..

14:43 (IST) 19 Apr 2023
विदर्भ, मराठवाड्यातील दुग्ध प्रकल्प; गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरले?

नागपूर : विदर्भ पुत्र व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून दिल्लीत झालेल्या बैठकीत विदर्भ आणि मराठवाडा विभागातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

सविस्तर वाचा..

14:42 (IST) 19 Apr 2023
‘वज्रमूठ’ सभा यशस्वी पण, काँग्रेसमधील नाराजी नाट्याचीच चर्चा

नागपूर : नागपूरची वज्रमूठ सभा यशस्वी झाली असली तरी यानिमित्ताने काँग्रेसमधील मानापमान नाट्य रंगले, माजी मंत्र्यांच्या अनुपस्थितीने या पक्षात सर्वच काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा..

14:42 (IST) 19 Apr 2023
वर्धा : बाजार समिती निवडणुकीत बहीण – भाऊ परस्पर विरोधात

वर्धा : पक्षीय चिन्हावर लढल्या जात नाही म्हणून बाजार समित्यांच्या निवडणुकीत विविध आघाड्यांना उधाण आले आहे. हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समितीत असे चित्र असून, मधूर संबंध संपुष्टात आल्याची स्थिती आहे.

सविस्तर वाचा..

14:41 (IST) 19 Apr 2023
मुंबई : नात्यातील अवयवदानाला वाढता प्रतिसाद; १० महिन्यांमध्ये झाल्या ५२ शस्त्रक्रिया

मुंबई : अवयवदानाकडे नागरिकांचा कल वाढावा यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मेंदूमृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून अवयवदानास प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र नात्यांमधील अवयवदानालाही आता नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. मुंबई शहरामध्ये मागील १० महिन्यांमध्ये नात्यामध्ये ५२ अवयवदान झाले. यामध्ये परदेशातील एका नातेवाईकाने अवयवदान केल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा..

14:40 (IST) 19 Apr 2023
अमरावती : दिराने केला वहिनीसोबत बळजबरीचा प्रयत्न

अमरावती : दिराने आपल्या वहिनीसोबतच बळजबरीचा प्रयत्न केला. वहिनीने प्रतिकार केल्यावर दिराने त्यांना चावा घेतला. ही संतापजनक घटना चांदूरबाजार ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

सविस्तर वाचा..

14:40 (IST) 19 Apr 2023
काँग्रेस-शिवसेनेची जवळीक वाढली

विधानसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्पर विरोधी विचारांचे तीन पक्ष एकत्र आले, त्यांनी भाजपला सत्तेवरून दूर करीत सत्तेचा कब्जा मिळवला. शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणून त्यांनी निवडणूकपूर्व युती करूनही सत्ता स्थापनेच्या क्षणी भाजपशी फारकत घेऊन भाजपला एकाकी पाडले.

सविस्तर वाचा..

14:39 (IST) 19 Apr 2023
भोसरी जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण : महसूल मंत्री म्हणून खडसे यांच्या पदाचा दुरूपयोग अयोग्य, जावयाला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई : सादर पुराव्यांचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकथान खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची जामीन याचिका फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

सविस्तर वाचा..

14:38 (IST) 19 Apr 2023
भंडारा : लग्न सोहळा आटोपून येणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी

भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील घिवारी येथे लग्न सोहळा आटोपून १८ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास परत निघालेल्या वऱ्हाड्याच्या वाहनाला तुमसर – गोंदिया राज्य मार्गावरील नवेगाव शेजारी अपघात झाला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत.

सविस्तर वाचा..

14:37 (IST) 19 Apr 2023
नागपूर : उपराजधानीत चक्क १ किलोचा एक आंबा..

नागपूर : शहरातील कळमना येथील कृषी उत्पन्न बाजारात सध्या आंब्याची आवक वाढली असताना एका व्यापाराकडे चक्क एक किलो वजनाचा एक आंबा विक्रीला असून या आंब्याची सध्या बाजारात चांगलीच चर्चा असून या त्याची मागणी वाढली आहे.

सविस्तर वाचा..

14:12 (IST) 19 Apr 2023
श्रीसदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून सुषमा अंधारेंचं अमित शाहांवर टीकास्र; म्हणाल्या, “मतांचं राजकारण करण्यासाठी...”

महाराष्ट्र सरकारने रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दरम्यान, याचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटताना दिसून येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सविस्तर वाचा

13:22 (IST) 19 Apr 2023
मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याच्या कामावरून आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकारवर टीकास्र

मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याच्या कामामध्ये शिंदे सरकारकडून घोटाळा सुरू असल्याचा आरोप अदित्य ठाकरे यांनी केला आहे. कंत्राटं काढून तीन महिने झाले, पण अजूनही काम सुरू झालेलं नाही. राज्यात विकासाच्या नावावर केवळ घोटाळे सुरू आहे. हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

13:18 (IST) 19 Apr 2023
भ्रष्टाचाराच्या आरोपावर संजय राठोडांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता मंत्री संजय राठोड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं ते म्हणाले.

13:17 (IST) 19 Apr 2023
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद घटेल सांगणारा 'तावडे अहवाल' खरा आहे का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपा नेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वात एक सर्व्हेक्षण झालं आहे आणि त्यांनी दिलेल्या अहवालानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद घटेल, अशी जोरदार चर्चा आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता त्यांनी या अहवालातील दाव्यांवर भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (१९ एप्रिल) नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

सविस्तर वाचा...

13:16 (IST) 19 Apr 2023
विश्लेषण : अमेरिकेत गर्भपाताच्या गोळ्यांवरील निर्बंधांना स्थगिती का मिळाली? हा वाद नेमका काय आहे?

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सॅम्युएल अलिटो यांनी, गर्भपातासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मिफप्रिस्टेन या औषधाच्या वितरणावर निर्बंध लादणारा कनिष्ठ न्यायालयाचा (डिस्ट्रिक्ट कोर्ट) आदेश स्थगित ठेवला आहे. या गोळ्यांवर बंदी घालावी यासाठी गर्भपातविरोधी संघटना आणि डॉक्टरांनी फिर्याद दाखल केल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने त्यावर निर्बंध आणले. मात्र, हे निर्बंध दूर करावेत अशी आपत्कालीन विनंती बायडेन सरकार आणि औषध उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यानुसार हा खटला सुरू आहे. या घडामोडींमधून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सविस्तर वाचा...

13:16 (IST) 19 Apr 2023
विश्लेषण : देशात, राज्यात उष्माघात बळींचे प्रमाण सातत्याने का वाढत आहे?

जागतिक तापमान वाढीमुळे सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. परिणामी, उन्हाचा तडाखा वाढत आहे. मागील काही वर्षांपासून तापमानात होत असलेल्या वाढीचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. तापमानवाढीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. शेती, उद्योगांबरोबरच देशाच्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम होताना दिसत आहे. अलीकडे खारघरमधील दुर्दैवी घटनेमुळे उष्माघाताचे विपरीत परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 19 Apr 2023
'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ', अजित पवारांचा उल्लेख करत भाजपाकडून संजय राऊत लक्ष्य, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर स्वतः अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व दावे फेटाळून लावत आपण राष्ट्रवादीतच असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता भाजपाने अजित पवारांच्या निमित्ताने शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 19 Apr 2023
विश्लेषण : रणजी विजेतेपदाचे पारितोषिक ‘आयपीएल’मधील तिसऱ्या क्रमांकापेक्षा कमीच?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतंर्गत क्रिकेट स्पर्धांतील बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असे असले तरी प्रतिष्ठेची रणजी स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला विजेतेपदासाठी मिळणारी रक्कम ‘आयपीएल’मध्ये तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघापेक्षाही कमी आहे. ‘बीसीसीआय’ने रणजीसह अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केली, पण ती पुरेशी आहे का, तसेच या वाढीमागचे नेमके कारण काय आणि देशातील क्रिकेट वाढीस किती फायदा होणार याचा घेतलेला आढावा.

सविस्तर वाचा...

13:14 (IST) 19 Apr 2023
खळबळजनक! महिला काँग्रेस नेत्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास यांच्यावर छळाचे गंभीर आरोप; म्हणाली, "वरिष्ठांनी..."

काँग्रेस नेत्या आणि आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही यावर अद्याप साधी चौकशी समितीही नेमण्यात आलेली नाही, असंही त्यांनी नमूद केली. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्या बुधवारी (१९ एप्रिल) एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 19 Apr 2023
येऊरचे प्रवेशद्वार आता सायंकाळी ७ वाजताच बंद, रात्रीच्या पार्ट्यांना चाप बसण्याची शक्यता

ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अत्यंत संवेदनशील भाग असलेल्या तसेच ठाण्याचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलाचे प्रवेशद्वार सायंकाळी ७ वाजतापासून बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगी दिलेल्या दोन उपाहारगृहातील कर्मचारी, गावातील आदिवासी, वायू दलाचे अधिकारी, कर्मचारी यांनाच सायंकाळी ७ नंतर प्रवेश असणार आहे.

वाचा सविस्तर...

11:49 (IST) 19 Apr 2023
“मुख्यमंत्र्यांनी श्रीसदस्यांच्या मृत्यूचा आकडा लपवला”, संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले...

“मुख्यमंत्री सुरुवातीपासून आकडे लपवत आहेत. त्यांचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव आहे. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्याच दिवशी हा आकडा १४ पर्यंत पोहोचला, असं स्थानिक लोक सांगत होते. पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्यावर दबाव टाकून हा आकडा सहा ते सातच सांगा, असे निर्देश दिले”, असा आरोप संजय राऊत यांनी केली आहे.

11:48 (IST) 19 Apr 2023
फडणवीसांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा - संजय राऊत

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केल्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे सरकावर टीका केली आहे. तसेच फडणवीसांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, असेही ते म्हणाले.

11:35 (IST) 19 Apr 2023
मुंबईतील मध्यवर्ती टपाल केंद्राचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईतील मध्यवर्ती टपाल केंद्राचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

11:15 (IST) 19 Apr 2023
दुपारच्या वेळी मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा सरकारचा निर्णय, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुपारी १२ ते ५ दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रम घेतला जाणार नाही, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

11:10 (IST) 19 Apr 2023
छगन भुजबळांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या भेटीला

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जातील, अशी चर्चा काल राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. त्यानंतर अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं. दरम्यान, आज अजित पवारांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि इतर काही नेतेमंडळी अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाली आहेत.

10:53 (IST) 19 Apr 2023
“ठाकरे-पवारांच्या भेटीनंतरच अजित पवारांबाबत...”; बंडखोरीच्या चर्चेवर बोलताना बावनकुळेंचं विधान

भाजपाकडे अजित पवारांच्या पक्षप्रवेशाबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या नेतृत्वावर कोण प्रश्न चिन्ह उपस्थित करतंय हे त्यांनीच तपासलं पाहिजे. आमच्याकडे अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. अजित पवारांची कुठेही भाजपाला संपर्क केला नाही. दोन वर्षांपासून त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठाकरे पवारांच्या भेटीनंतरच या चर्चांना उधाणं आलं, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

10:50 (IST) 19 Apr 2023
मुंबई : प्लास्टिकच्या पिशवीत सापडला चिमुरड्याचा मृतदेह

मुंबईः माहीम परिसरात बुधवारी पहाटे प्लास्टिकच्या पिशवीत दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा..

10:50 (IST) 19 Apr 2023
नागपूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून

नागपूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचे प्रियकराने अपहरण करून गळा आवळून खून केला. गळफास घेतल्याचा बनाव करीत मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र, पोलिसांनी हत्याकाडाचा छडा लावत प्रियकर-प्रेयसीसह चौघांना अटक केली.

सविस्तर वाचा..

10:49 (IST) 19 Apr 2023
अमरावतीत ‘ब्रॅण्डेड’च्या नावावर बनावट घड्याळींची विक्री

अमरावती : शहरात ‘ब्रॅण्डेड’ कंपन्‍यांच्या नावावर बनावट घड्याळी विक्री करण्याचा प्रकार खोलापुरी गेट पोलीस व संबंधित कंपनीच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला. जवाहर गेट परिसरातील शनि मंदिराजवळ असलेल्या डायमंड वॉच या प्रतिष्ठानावर छापा टाकून पथकाने ६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सविस्तर वाचा..

10:07 (IST) 19 Apr 2023
श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा घ्यावा, संजय राऊतांची मागणी

श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदेंसह मुनगंटीवरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असेही ते म्हणाले.

09:59 (IST) 19 Apr 2023
“कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही”, मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हणाली “नाकावरची माशी…”

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण म्हणजे देविका. यात देविका हे पात्र अभिनेत्री राधिका देशपांडे साकारत आहे. नुकतंच राधिकाने सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा

09:58 (IST) 19 Apr 2023
गडचिरोली : ना दुभत्या गायी मिळाल्या ना पैसे! भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात

गडचिरोली : केंद्रवर्ती निधीतून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेच्या माध्यमातून आदिवासी लाभार्थ्यांना व्यवसायासाठी दुभत्या गायी वाटप योजनेमध्ये मोठा घोळ समोर आला असून, गायी घेण्यासाठी खात्यात आलेले तब्बल २० लाख इतर खात्यात वळवण्यात आले. हा व्यवहार अशिक्षित आदिवासींची दिशाभूल करून त्यांचे अंगठ्याचे ठसे घेऊन करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा..

09:57 (IST) 19 Apr 2023
उष्माघात नव्हे तर चेंगराचेंगरीत १४ जणांचा मृत्यू? आव्हाडांनी थेट VIDEO शेअर करत विचारला सवाल

सविस्तर वाचा

09:57 (IST) 19 Apr 2023
नागपूर : महाविद्यालय, शासकीय कार्यालयात ‘हेल्मेट सक्ती’; विना हेल्मेट येणाऱ्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

नागपूर : परिवहन खात्याने राज्यभऱ्यातील विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या ‘हेल्मेट सक्ती’साठी नवीन क्लृप्ती शोधली आहे. त्यानुसार दुचाकीने विना हेल्मेट महाविद्यालयात आलेला विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

सविस्तर वाचा..

09:56 (IST) 19 Apr 2023
“बरं झालं अजित पवारांनीच हे कारस्थान उधळून लावलं, त्यामुळे…”; बंडखोरीच्या चर्चेवरून ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल!

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती दिली. दरम्यान, यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपावर टीकास्र सोडलं आहे. अजित पवारांविरोधात वावड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपानेच केलंय, असं ते म्हणाले. ठाकरे गटाने मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून ही टीका करण्यात आली.

सविस्तर वाचा

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात तब्बल ४३४ अनधिकृत होर्डिंग असून याचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. आतापर्यंत महापालिकेने अवघ्या १२७ बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली. पिंपरी महापालिकेने तयार केलेले होर्डिंग धोरण शासनाने रद्द केले. त्याऐवजी राज्य शासनाने ९ मे २०२२ रोजी सर्वच महापालिकांसाठी धोरण केले. त्याला एक वर्ष पूर्ण होत आले, तरी पिंपरी महापालिकेकडून या धोरणाची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही.