Maharashtra News Today: गणेशोत्सव आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात प्रत्येक पक्ष रणनीती आखत असताना आता शिवसेना (ठाकरे) आणि मनसे पक्षानेही पुढचे पाऊल टाकले आहे. आज उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे दादर येथील शिवतीर्थ निवासस्थान गाठले. त्यांच्यात आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. लवकरच याबाबतची अधिक माहिती समोर येईल.
Live Updates
Marathi News Live Updates | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू नये - मंत्रिमंडळ उपसमितीची ठाम भूमिका
मराठा समाजातील नागरिकांना अवैध व सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्यास ओबीसींसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीने तीव्र विरोध केला आहे. ...सविस्तर बातमी
Sri Sri Ravi Shankar on Nepal violence : नेपाळ हिंसाचारावर श्री श्री रविशंकर यांचे महत्त्वपूर्ण विधान, हिंसाचारात षडयंत्राचा भाग तर…
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंग महारुद्र पूजा आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत महा सत्संग नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
Nagpur Metro : महामेट्रो प्रवाशांचा डिजिटल प्रवास; ५७ % तिकीट विक्री ऑनलाइन
जास्तीत जास्त प्रवाशांकडून तिकीट खरेदीसाठी डिजीटल पेमेन्टसचा वापर हा मेट्रो प्रवाशांचा डिजीटल कल दर्शवतो. ...सविस्तर बातमी
मध्य रेल्वेवर प्रवाशांसाठी सुविधा वाढल्या; आठ महिन्यांत १० सरकते जिने, ९ उद्वाहक सुरू
मुंबई विभागाने जानेवारी - ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, लिफ्ट, पादचारी पूल, रेल्वेचे विविध इंडिकेटर, एटीव्हीएम बसविले आहेत. ...सविस्तर बातमी
बेस्टच्या निवडणुकीत पाहिले असेल की, पुर्वीची क्रेझ संपली.., आनंदराज आंबेडकर यांचा ठाकरे बंधूंना टोला
ठाकरे बंधूंप्रमाणेच आंबेडकर बंधूंचे मनोमिलन होणार का आणि ते एकत्र येणार का असा प्रश्न पत्रकारांनी आंबेडकर यांना विचारला. त्यावर राजकारणात कधीही काही होऊ शकते. ...अधिक वाचा
Gorbanjara Community ST Reservation Demand :‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्यासाठी आता ‘हा’ समाज आक्रमक
महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोरसेनेने वाशीममध्ये आक्रमक भूमिका घेतली. ...वाचा सविस्तर
‘शकुंतले’चा वनवास संपणार! ब्रॉडगेज रुपांतराच्या ‘डीपीआर’ला अखेर मंजुरी…
२०१८ पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती सातत्याने विविध आंदोलने, उपोषण आणि रास्तारोकोच्या माध्यमातून शकुंतला रेल्वेमार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधत आहे. ...सविस्तर बातमी
Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेची 'टीम - २१' ची रणनीती !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र अशी २१ जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे. ...वाचा सविस्तर
पिंपरी- चिंचवडमधील बटरफ्लाय पूल ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू! एलईडी तंत्रज्ञान वापरत करण्यात आली विद्युत रोषणाई
थेरगाव येथे पवना नदीवर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारलेला बटरफ्लाय पूल आता रोषणाईच्या झळाळीने अधिकच खुलून दिसत असून,रात्रीच्या वेळी पुलावर साकार होणारा रंगोत्सव नागरिकांना आकर्षित करत आहे.
...वाचा सविस्तर
अभिनव आंदोलन करणारे काँग्रेसचे देवानंद पवार भाजपमध्ये…
काँग्रेसमधून बाहेर पडताना पवार यांनी पक्षातील स्थानिक ज्येष्ठ नेत्यांवर जातीयवादाचा ठपका ठेवला. ...सविस्तर बातमी
आरोग्य विभागातील हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर २३ दिवसांनंतर मिटला!
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर बुधवारी अखेर मागे घेण्यात आला. ...सविस्तर वाचा
सांगली महापालिका क्षेत्रात मोकाट पशू पकडण्याची मोहीम
सांगली महापालिका क्षेत्रात मोकाट फिरणार्या पशूंना पकडण्याची मोहीम हाती घेतली असून, १४ घोड्यांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे.
...सविस्तर बातमी
ऐन विमान प्रवासात शीतपेयाचे सेवन केल्यानंतर प्रवाशाची प्रकृती बिघडली… गोवा-पुणे विमानात काय घडले?
गोवा ते पुणे विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला विमान कंपनीकडून देण्यात आलेल्या शीतपेयात धातूचे तुकडे असल्याने पेय गिळताना दुखापत झाली त्यामुळे प्रवाशाला पुणे विमानतळावर उतरताच उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...सविस्तर बातमी
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खिळ्यांमुळे तीन वाहनांचे टायर पंक्चर, एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण
Nagpur Mumbai Expressway Bridge News: समृद्धी महामार्गावर खिळे टाकण्यात आल्याची ध्वनिचित्रफित बुधवारी सकाळपासून मोठी प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही ध्वनिचित्रफित व्हायरल झाल्यानंतर अखेर आता एमएसआरडीसीने यासंबंधी खुलासा केला आहे. ...अधिक वाचा
AI Use In Healthcare : कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (एआय) अवाजवी विश्वासाने रुग्णांचे आरोग्य धोक्यात!
ICMR IMA Caution Against Replacing Doctors with AI : डिजिटल युगात इंटरनेट व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मुळे आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होत असली तरी त्याचा अतिरेकी वापर आता आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. ...वाचा सविस्तर
ठाण्यात जागतिक वारसा असलेल्या शिवदुर्गांचा इतिहास उलगडणार; जोशी बेडेकर महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. या जागतिक वारसा स्थळांचा इतिहास ठाण्यात व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. ...वाचा सविस्तर
शुल्लक कारणावरुन वडगाव मावळमध्ये भर चौकात गोळीबार, तिघे अटकेत
भावकितील मुलीला शाळेतून घरी सोडवल्याचा राग मनात धरून एकावर पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना पुण्याच्या वडगाव मावळमध्ये घडली आहे. ...अधिक वाचा
इंडिया आघाडीच्या खासदारांनी केले एनडीएला मतदान... श्रीकांत शिंदे यांनी मानले त्यांचे आभार
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार निवृत्त न्या. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या दरम्यान ‘इंडिया’ आघाडीची किमान १२ मते फुटल्याचे मानले जात आहे. ...सविस्तर वाचा
इमारत गच्ची दुरुस्तीची जबाबदारी सोसायटीचीच; उच्च न्यायालयाने सोसायटीची याचिका फेटाळली
नवी मुंबई येथे सफल काॅम्प्लेक्स नावाची गृहनिर्माण सोसायटी आहे. या गृहनिर्माण संस्थेत १२ इमारती असून सर्व इमारती सात मजल्याच्या आहेत. ...वाचा सविस्तर
Goregaon Fire :शालिमार इमारतीत भीषण आग, मीटर बॉक्सला आग लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
गोरेगाव येथील एस. व्ही. मार्गावरील सिद्धी गणेश सोसायटीतील शालिमार या पाच मजली इमारतीला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली. ...वाचा सविस्तर
डोंबिवलीतील ६५ इमारतींवर कारवाई केल्यास रहिवाशांचे आंदोलन अधिक तीव्र; जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा इशारा
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींमधील एकही रहिवासी बेघर होणार नाही यासाठी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिले आहेत. ...सविस्तर बातमी
Thane Municipal Corporation Election: ठाण्याच्या प्रभाग रचना सुनावणीदरम्यान मनसे नेते अविनाश जाधव संतापले, म्हणाले...
बुधवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे राजन विचारे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ...सविस्तर वाचा
BSP:बहुजन समाज पक्षाची आगामी निवडणुकीत…धुळे जिल्ह्यासाठी पदाधिकाऱ्यांची मोठी घोषणा
जिल्हा परिषद आणि धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ...सविस्तर वाचा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवास सातारकरांचा प्रतिसाद; निर्माल्य व्यवस्थापन उपक्रमात सर्वाधिक सहभाग
सातारा जिल्ह्यामध्ये यंदाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ...सविस्तर बातमी
ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना.., जितेंद्र आव्हाडांचा सुनावणीदरम्यान गंभीर आरोप
ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या २७० तक्रारींवर आज, बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. ...सविस्तर बातमी
आज तुम्ही सत्तेत, उद्या आम्ही… का म्हणाल्या सुप्रिया सुळे?
नक्षलवादासाठी नवीन जनसुरक्षा कायदा कशासाठी आणला, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित करत हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नसून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतो आहे, अशा शब्दात सरकारवर टीकास्त्र डागले आणि जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध दर्शविला.
...अधिक वाचा
डोंबिवली पश्चिमेत रस्ते वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या दोन रिक्षा चालकांवर गुन्हे
ऋतिक सुरेश वाकोडे (२१), अविनाश दिलीप भालेराव (२२) अशी गुन्हा दाखल रिक्षा चालकांची नावे आहेत. ...वाचा सविस्तर
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींवरील कारवाईला शासन बैठकांचा अडथळा? शासन-कडोंमपा टोलवाटोलवीत ६५ इमारतींना अभय
डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारती तोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे गेल्या वर्षीचे आदेश आहेत. ...सविस्तर वाचा
IPS अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या खडाजंगीबाबात आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (संग्रहित छायाचित्र)