Maharashtra News Today, 02 November 2023 : सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठा आरक्षणाबाबत पेच कायम आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करूनच न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा ठराव करीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन बुधवारी केले. मात्र, मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची आक्रमक भूमिका जरांगे यांनी जाहीर केली. यासह विविध राजकीय, क्राइम घडामोडी जाणून घेणार आहोत…
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर...
कुमार मंगलम बिर्ला, गौतम अदानी, बजाज कुटुंब, अनिल अग्रवाल, नंदन नीलेकणी आणि सायरस आणि अदार पूनावाला यांचा आघाडीच्या १० परोपकारी व्यक्तींमध्ये समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या हद्दीतून जाणारे सर्व राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर व इतर मार्गांकरीता पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.
सरकारचं शिष्टमंडळांची जरांगे-पाटलांबोरबर चर्चा सुरु आहे शिष्टमंळाने जरांगे-पाटलांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. शिष्टमंडळामध्ये ४ मंत्री, २ निवृत्त न्यायमूर्ती आणि २ आमदारांचा समावेश आहे.
अकोला : गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्यावतीने गुरुवारी दुपारी आमदारांच्या निवासस्थानासमोर धडक देत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान वंचित आघाडी व शिवसेना ठाकरे गटामध्ये वाद निर्माण झाला होता. आमदार नितीन देशमुख यांनी मराठा आंदोलनात राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित केल्यावर त्यांच्यात व वंचित बुजहन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यात बाचाबाची झाली.
भिडेवाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी न्यायालयाने फेटाळली. स्मारकासाठी तेरा वर्षे संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, अशी विचारणा करतानाच एक महिन्यामध्ये जागा रिकामी करून ती महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची याचिका फेटाळल्याने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
भिडेवाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी न्यायालयाने फेटाळली. स्मारकासाठी तेरा वर्षे संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, अशी विचारणा करतानाच एक महिन्यामध्ये जागा रिकामी करून ती महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची याचिका फेटाळल्याने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
"कागपदपत्रे ६ तारखेपर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. २१ तारखेपासून आमदार अपात्रता प्रकरणी नियमीत सुनावणी होईल. त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष वेळापत्रक सादर करतील. २१ तारखेला पहिला साक्षीदार तपासला जाईल," अशी माहिती विधिमंडळातील सुनावणीनंतर वकिलांनी दिली आहे.
महाकवी कालिदास कलामंदिरात पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.
नागपूर : देवेंद्र फडणवीसांचे प्रवक्ते नितेश राणे यांनी राहुल गांधी यांनी मनोज जरांगे पाटलांना फोन केला का? हे विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरांगे पाटलांना फोन का केला नाही हे सांगावे, असा प्रतिप्रश्न काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. त्यांनी याबाबत चित्रफीत प्रसिद्ध केली आहे.
चंद्रपूर: हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते. धुके, थंडी आणि संथ वाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होत असल्याने प्रदूषणात वाढ होते. हिवाळ्याच्या पहिल्याच महिन्यात चंद्रपूरच्या प्रदूषणाचे दिवस वाढले असून ३१ दिवसांपैकी ३१ दिवसही प्रदूषण आढळले आहे. मात्र, हे प्रदूषण जीवघेणे व धोकादायक नसल्याने ही बाब चंद्रपूरकरांसाठी समाधानकारक आहे.
तालुक्यात औद्योगिकीकरण आणि नागरीकणामुळे झपाट्याने लोकसंख्या वाढत असून उरणकरांच्या पाण्याची तहान भागविणारे जलस्रोत अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे रानसई धरणातून पाणी पुरवठा करतांना सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज उसने पाणी घ्यावे लागत आहे. सविस्तर वाचा…
मराठा समाजाला ४० दिवसात आरक्षण दे दिलेले आश्वासन न पाळता राज्य शासनाने फसवणूक केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आकुर्डीतील तहसील कार्यालयावर २ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला.
भिडेवाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी न्यायालयाने फेटाळली. स्मारकासाठी तेरा वर्षे संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, सविस्तर वाचा…
जळगाव जामोद येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते पक्ष भेद विसरून एकवटल्याचे चित्र आहे. उपविभागीय अधिकारी ( महसूल) यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
बुलढाणा: महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी खळबळजनक मागणी ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसेच राज्यपालांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अशी पूरक मागणीही त्यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.
पाच लाख टनापेक्षा अधिक ऊस उपलब्ध झाल्यास तीन हजार रुपये प्रति टन भाव देण्यात येईल, असे आश्वासन बागलाण तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिले.
गडचिरोली : कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कुटुंबियांचे ‘एटीएम’ असून यात हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. आज गुरुवारी त्यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणाला भेट दिली. यावेळी आंबटपल्ली गावात झालेल्या सभेत त्यांनी हे आरोप केले.
नागपूर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात मराठवाड्यात लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेचा तेली समाजाने जाहीर निषेध करत एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरू व त्याची जबाबदारी शासनाची असेल, असा निर्वाणीचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
नागपूर : विश्वचषकाचा एकही सामना नागपूरमध्ये आयोजित केला नसल्याने शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये आधीच निराशा होती. क्रीडाप्रेमींचा रोष कमी करण्यासाठी नागपूरमध्ये १ डिसेंबरला भारत-ऑस्ट्रेलियाचा टी-२० सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर ‘ड्रेनेज’चे कार्य सुरू असल्याने हा सामनाही आता रायपूरमध्ये स्थानांतरित केला जाणार असल्याची माहिती आहे.
जर त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायचा होता तर त्यांनी संचालक पदाचाही राजीनामा देणे अपेक्षित होते, असे संचालक मंडळाने म्हटले आहे.
भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाशी संबंधित ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.
ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गिकेवर २८ नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री प्रवेशबंदी लागू केली आहे.
"ज्यांनी मोगलांच्या तलवारी छातीवर घेतल्या. त्यांच्याच छातीवर सरकार तलवारी चालवत असेल, तर तुमची तुलना मोगलांबरोबर करण्याची वेळ येऊ नये," असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.
"ओबीसींना भेटलेले आरक्षण कमीच आहे. ओबीसींचा देशात वाटा जास्त आहे. पण, २७ टक्क्यांवर आरक्षण नाही. तर, ओबीसी आरक्षण वाढवून घ्या किंवा अ,ब,क,ड असे वर्ग करा. पण, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण थेट नाही म्हणणं, हा खूप चुकीचा संदेश आहे. मराठा ओबीसी नाही का? मग ते कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील आहे? मराठ्यांचा आरक्षणावर अधिकार का नाही? मराठ्यांचं मागासलेपण सरकारला माहिती नाही. महाराष्ट्रात वाढत चाललेला भेदभाव चुकीचा आहे. सगळीकडे मराठा कुणबी आहे. फक्त मराठवाड्यातील मराठा लिहिल्यानं चालत नाही," अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
ससून रुग्णालयामधून फरार झालेल्या अमली पदार्थ तस्कर ललित पाटील या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे.
ओळखीच्या निमित्ताने उपाध्याय याने मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देण्याचे आमिष यादव कुटुंबीयांना दाखवले.
मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचा पथक सराटी येथे दाखल झालं होतं. पण, जरांगे-पाटलांनी तपासणी करून घेण्यास नकार दिला आहे.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कामगारांमुळे ग्राहकांना क्षय रोगाची लागण होऊ नये या उद्देशातून हे अभियान शहरात राबविण्यात येत आहे.
"सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे सरकारमध्ये संवाद नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे लागू करण्यात आलेली धाराशिव, बीड येथील संचारबंदी बुधवारी उठविण्यात आली. मात्र, भय आणि अफवांमुळे बाजारपेठा बंद होत्या. मंगळवारी उशिरा रात्री पाटोदा तालुक्यातील पुसळंब येथे अज्ञातांनी पोलीस चौकी पेटवून दिली. तर पूर्णा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीलाही आग लावण्याचा प्रयत्न झाला. हिंगोली येथे नव्याने दोन जणांच्या आत्महत्या आरक्षणाच्या मागणीसाठी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचारातील घटनांमध्ये ९९ जणांना, नांदेडमध्ये ५० जणांना तर धाराशिवमध्येही हिंसक आंदोलकांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.