Maharashtra News Highlights: उपराष्ट्रपतिपदासाठी आज (९ सप्टेंबर) निवडणूक पार पडणार आहे. इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन सेड्डी व एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. बीआरएस, बीजेडी व शिरोमणी अकाली दल हे पक्ष या निवडणुकीत मतदान करणार नाहीत. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून आपण या निवडणुकीचे सर्व अपडेट्स या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दुसऱ्या बाजूला, मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, “काही लोकांना वाटत होतं की माझी राख होतेय, तेवढ्यात मी भरारी घेतली. मी आव्हानांपासून पळून गेलो नाही.” यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ शकते.
मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टीमेटम
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटमधील नोंदींप्रमाणे मराठा कुटुंबांना जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा अन्यथा मराठवाडा मुक्तीदिनी आयोजित कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांवर बंदी घालू.
आज राज्य सरकारची ओबीसी संघटनांबरोबर बैठक
दुसऱ्या बाजूला राज्य सरकारची आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाबरोबर बैठक होणार आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार परिणय फुके यांच्यासह ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ या बैठकीला जातात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींकडे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्राशी संबंधित बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.
अकोल्यातील शेतकऱ्यांना पाणी दिलासा; सविस्तर वाचा, राज्य सरकारचा निर्णय काय...
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या, नमो शेतकरी महासन्मानचा सातवा हप्ता कुणाला मिळणार?
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या, नमो शेतकरी महासन्मानचा सातवा हप्ता कुणाला मिळणार?
OBC Maratha Reservation : मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात करावी - मंत्रिमंडळ उपसमितीचे निर्देश
OBC Maratha Reservation : मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात करावी - मंत्रिमंडळ उपसमितीचे निर्देश
Noise Pollution On Ganpati Visarjan : आवाज’वर पावसाचे पाणी; यंदा विसर्जन मिरवणुकीत आवाजाची नोंदच नाही
उपसा योजनांच्या वीज सवलतीस दोन वर्षे मुदतवाढ; राज्य सरकारवर १७५८ कोटी रुपयांचा आर्थिक भार
‘हेच का तुमचे स्टील हब’; खड्ड्यांमुळे त्रस्त गडचिरोलीकरांचा पालकमंत्री फडणवीसांना संतप्त सवाल
Mumbai Crime : बॅनर लावण्यास विरोध केल्याने रिक्षा चालकाच्या घराला लावली आग
Stock Market Update : फेड दर कपातीच्या आशेने…‘सेन्सेक्स’ची ३१४ अंशांची कमाई
MPSC Result : एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर : १५१६ उमेदवार मुलाखतीला पात्र; वाढलेला कट ऑफ पाहून…
"नेपाळसारखी घटना कुठल्याही देशात घडू शकते", 'तो' व्हिडीओ शेअर करत राऊतांचं वक्तव्य
अन....महामार्ग अधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी दिली शाल श्रीफळची भेट
Buldhana Bear Rescue Video : मादी अस्वलसह पिल्लाला सोडले अभयारण्यात…रेस्क्यूचा थरारक व्हिडीओ!
Clean Air Survey 2025 : ‘या’ शहराची हवा सर्वांत स्वच्छ, देशात पहिला क्रमांक आणि ७५ लाखांचा पुरस्कार...
Chandrapur ZP Engineer Caught On Camera Accepting Bribe : कंत्राटदाराकडून पैसे घेतांनाचा व्हीडिओ सार्वत्रिक; मुख्य अभियंता निलंबित
अजगराला ठार मारून त्यावर नाचत पोट फाडून बकरी काढतानाची चित्रफित प्रसारित
आठ दिवसातच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बंदोबस्तासाठी तैनात दोन पोलिसांना मोटारगाडीची धडक… एकाचा मृत्यू, महिला पोलीस जखमी
मराठा आरक्षणाच्या जीआरवरून महायुतीतलं वातावरण तापलं, शिंदे-भुजबळांची परस्परविरोधी वक्तव्ये
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांना दिली होती, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की "आम्ही केवळ कुणबी प्रमाणत्र देण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मी छगन भुजबळांशी चर्चा केली होती." मात्र, सरकारने आमच्याशी कुठलीही चर्चा केली नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.