Maharashtra News Today, 08 August 2023 : राज्याचे पावसाळी अधिवेशन संपले असून सगळेच आमदार आता आपल्या मतदारसंघात परतले आहेत. राज्यातील विविध शासन कार्यमक्रमांनाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांचं कौतुक केलं होतं. तर, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याच्याही वावड्या उठल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुफान कोसळलेल्या पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारली आहे. मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत केवळ तुरळक सरी कोसळल्या आहेत. राज्यातील राजकारण, पावसाचे अपडेट्स आणि इतर घडामोडी जाणून घेऊयात.

Lok Sabha Election 2024
“भाऊ म्हणून मी पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “अजितदादा विसरले असतील, पण…”
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
What DCM Devendra Fadnavis Said About Nana Patole?
नाना पटोलेंच्या कार अपघातावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, “महाराष्ट्राच्या राजकारणात…”
Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

19:50 (IST) 8 Aug 2023
आनंदवार्ता! मुंबईतील १० टक्के पाणी कपात बुधवारपासून रद्द; पाणीपुरवठा करणाऱ्या ‘या’ सात धरणांच्या पाणी पातळीत वाढ

गेल्या महिन्याभरापासून मुंबईमध्ये सुरू असलेली १० टक्के पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावक्षेत्रात जुलै २०२३ मध्ये पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पाणीसाठा ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा

19:38 (IST) 8 Aug 2023
धुळ्यातील स्वामी नारायण मंदिरात दहशतवादी शिरतात, अन्…

स्वामी नारायण मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास यंत्रणा किती मिनिटात घटनास्थळी पोहचू शकते, हे पाहण्यासाठी हा सराव करण्यात आला. मंदिर व्यवस्थापकाने सोमवारी सायंकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला मंदिरात दोन दहशतवादी शिरल्याची माहिती दिली.

सविस्तर वाचा

18:22 (IST) 8 Aug 2023
आशाताईंच्या सूरांनी रंगणार त्यांचा नव्वदावा वाढदिवस; दुबईत ८ सप्टेंबरला ‘आशा@90’ लाईव्ह कॉन्सर्ट

मुंबई: प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त दुबईत ‘आशा@90’ या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

18:10 (IST) 8 Aug 2023
यवतमाळलगतच्या वाघाडीतील पूर ओसरला, वेदना कायम!; पाच हजारांची मदत देवून प्रशासनाने…

यवतमाळ: शहरालगतच्या वाघाडी नदीच्या काठावर वसलेल्या वस्तीसाठी २१ जुलैची रात्र काळरात्र ठरली. पुरामुळे या वस्तीतील १०५ घरांची पूर्णतः वाताहत झाली. मात्र त्या रात्रीपासून सुरू झालेला संघर्ष वस्तीत अजूनही सुरू आहे.

सविस्तर वाचा...

17:32 (IST) 8 Aug 2023
भावना टिपायला लेखक पोहोचला रेल्वे स्थानकात, पण पोलिसांनी उचलले अन….

नागपूर: जो न देखे रवी ते देखे कवी…. अशी एक मराठीत म्हण आहे. असाच एक कवी – लेखक काही तरी जिवंत व वास्तववादी लिहायच्या मोहाने झपाटून नागपूर रेल्वे स्थानकात पोहोचला.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 8 Aug 2023
वनविभाग पदभरतीलाही अखेर भ्रष्टाचाराचे ग्रहण‌? १९ लाखांचा दर, मोबाईल, बँकेचे चेक आणि….

नागपूर : राज्यात सुरू असलेल्या पदभरतीमध्ये गैरप्रकाराच्या तक्रारी रोज समोर येत आहेत. नोकरी लावण्याचे अमिष दाखवणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी एपीआय कार्नरजवळ सापळा रचून करिअर अकादमीच्या तीन संचालकांसह चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून फोर्ड कारसह सहा मोबाईल, विविध बँकेचे चेक आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

सविस्तर वाचा

16:47 (IST) 8 Aug 2023
स्पर्धा परीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी!

वाशिम: स्पर्धा परीक्षा शुल्क वाढी विरोधात आज वाशिम मध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त केला. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

सविस्तर वाचा...

16:45 (IST) 8 Aug 2023
नागपूर : गुन्हे शाखेच्या कार्यालयातच पोलीस कर्मचारी खेळतात जुगार; समाजमाध्यमांवर प्रसारित चित्रफितीमुळे खळबळ

लकडापूल परीसरात असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पोलीस चौकीचा पदभार वादग्रस्त पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ठाकरेंनी पदभार सांभाळल्यानंतर युनीटमधील पोलीस कर्मचारी सुस्त पडले होते.

सविस्तर वाचा

16:43 (IST) 8 Aug 2023
भाजप नेत्यांचे हात खासदार असुद्दीन ओवेसींच्या हातात!

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे सोमवारी पार पाडले. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व  माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले.

सविस्तर वाचा

16:29 (IST) 8 Aug 2023
“आहे का इथे कुणी माई का लाल, जो म्हणेल…”, मुनगंटीवारांच्या व्हायरल क्लिपमुळे फडणवीसांची फजिती

नागपूर: परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवरून सध्या राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी पेपरफूट होत असून वाढीव परीक्षा शुल्काचे पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरले.

सविस्तर वाचा

16:21 (IST) 8 Aug 2023
भुयारी मार्गाचा प्रयोग अयशस्वी ठरूनही नागपुरात आणखी एक नवा मार्ग; केंद्राने दिले ८० कोटी

नागपूर: शहरातील विद्यमान भुयारी मार्गाचा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष उपयोग होत नसल्याचे दिसून आल्यावरही आता पुन्हा मॉरिस कॉलेज जवळ नवीन भुयारी मार्ग बांधण्याचा घाट घातला जात आहे.

सविस्तर वाचा...

15:55 (IST) 8 Aug 2023
सोने-चांदीच्या दरात चढ-उतार, प्लॅटिनम स्थिर; नागपुरात आहेत ‘हे’ दर

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार ८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ८०० रुपये होते. तर चांदी प्रति किलो ७१ हजार ८०० रुपये होती.

सविस्तर वाचा

15:49 (IST) 8 Aug 2023
विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलकाची चर्चा; डोंबिवलीत क्रांतिदिनानिमित्त राजकीय परिस्थितीचे वाभाडे

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गोंधळसदृश्य परिस्थितीवर डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या चालकांनी ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून आपल्या शालेय बसवर फलक लावले आहेत.

सविस्तर वाचा

15:16 (IST) 8 Aug 2023
रविकांत तुपकरांचा ‘स्वाभिमान’ दुखावला! शिस्तपालन समितीसमोर जाणार नाही; म्हणाले, “आता निर्णय…”

बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वावर निशाणा साधणाऱ्या व मागील अनेक तासापासून ‘ नॉट रिचेबल’ असणाऱ्या रविकांत तुपकर यांनी आज मंगळवारी आयोजित शिस्त पालन समितीच्या बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतला! आपले म्हणणे मी वारंवार राजू शेट्टी यांच्यासह अन्य नेत्यांसमक्ष मांडले आहे.

सविस्तर वाचा...

15:13 (IST) 8 Aug 2023
"समुद्रकिनाऱ्यावर जैववैद्यकीय कचरा कोण फेकतं?" मनसेचा संतप्त सवाल

समुद्रकिनाऱ्यावर जैववैद्यकीय कचरा (Bio Medical Waste) कोण फेकतं ? पुन्हा एकदा मुंबईच्या माहीम समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जैववैद्यकीय कचरा (Bio Medical Waste) आम्हाला सापडला. ज्यात इंजेक्शन्स, रक्त चाचणीच्या बाटल्या इ. असतं. या पूर्वी सुद्धा याच जागी आम्हाला असाच कचरा मिळाला आहे. मुंबईतील इतर सर्व प्रमुख किनाऱ्यावर आम्ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत पण हा कचरा फक्त याच जागी का सापडतो? महापालिका प्रशासन, रुग्णालय प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ह्याचं उत्तर द्यावं - मनसे

https://twitter.com/mnsadhikrut/status/1688845804109455361?s=20

14:47 (IST) 8 Aug 2023
नागपूर: ५५३ पदे मंजूर असतानाही स्वच्छता निरीक्षक पदांचा समावेश नाही, विद्यार्थी आक्रमक

नागपूर : राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्वच्छता निरीक्षक गट ‘क’ श्रेणीची ५५३ पदे मंजूर असतानाही पदभरतीमध्ये या पदांचा समावेश नाही.

सविस्तर वाचा

14:46 (IST) 8 Aug 2023
नागपूर: आदासा मंदिर समितीचा नवा प्रयोग; आता पूजेचे साहित्य टोकण पद्धतीने

नागपूर : देवस्थान म्हटले की पूजा सामान विक्रेत्यांचा गोंगाट आलाच. भाविकांची गर्दी असणाऱ्या प्रत्येक देवस्थानाबाहेर विक्रेत्यांची नको तितकी चढाओढ अनेकदा डोके उठवणारी असते.आदासा येथील गणेश मंदिराची सुद्धा हीच गत होती.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 8 Aug 2023
बुलढाणा : जिल्हा परिषद प्रशासनाला उपरती; माटरगाव आंदोलनातील पालकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू

चौफेर टीकेच्या धनी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी  शिक्षण विभागाला हे निर्देश दिले . त्यानुसार गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर प्रकरणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ११ पालकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 

सविस्तर वाचा

14:29 (IST) 8 Aug 2023
जंगलव्याप्त गावातील विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; म्हणतात, “बसेस वेळेवर पाठवा”

शिक्षणाची ओढ पण शाळेची सोय नाही म्हणून मग परगावी पायपीट करीत किंवा इतर वाहनांनी शाळेत जाण्याची इर्षा मुलं मुली ठेवून आहेत. त्यातही दुर्गम जंगली भागात शाळा नसल्याने या भागातील मुलांची ओढाताण होते.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 8 Aug 2023
उरण शेतकरी आंदोलनाचा साक्ष असलेला नवघर फाटा वाहतुकीसाठी बंद

हा मार्ग पंचक्रोशीतील नवघर,पागोटे व कुंडेगाव तसेच भेंडखळ आदीसह उरणच्या पूर्व विभागातील गावांना जोडणारा होता. मात्र नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील रेल्वे वाहतुकीसाठी टाकण्यात आलेल्या रुळामुळे तसेच याच परिसरातील भूखंड सिडकोने नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र(सेझ)ला दिल्याने त्यांच्या ताब्यात गेला आहे

सविस्तर वाचा

13:59 (IST) 8 Aug 2023
“कुणी नाट्यगृह देता का नाट्यगृह!”, गोंदिया जिल्ह्यातील कलावंतांना नाट्यगृहाची; तर नाट्यगृहाला…

जिल्ह्यातील कलावंतांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांना आपली कला व प्रतिभा समोर आणण्याची संधी मिळावी, हा उदात्त हेतू समोर ठेऊन जिल्ह्यात एक नाट्यगृह उभारण्याचे नियोजन करण्यात आले.

सविस्तर वाचा

13:59 (IST) 8 Aug 2023
अकोला : क्रांतीदिनी ‘पंचप्राण शपथ’; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही उपक्रमात…

भारताला २०४७ पर्यंत विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान सदैव बाळगण्याची, एकता व एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष राहण्याची, नागरिकाचे कर्तव्य बजावण्याची व देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कायम आदर राखण्याची शपथ देशबांधव घेणार आहेत.

सविस्तर वाचा

13:58 (IST) 8 Aug 2023
नाशिक : महावितरण सेवा सप्ताहात पहिल्या दिवशी १५० उद्योजकांचे प्रश्न मार्गी

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी उद्योजक हे महावितरणला सर्वाधिक महसूल मिळवून देणारे महत्त्वाचे ग्राहक असून त्यांना विनाखंड आणि नियमित वीज पुरवठा करणे हे महावितरणचे कर्तव्य असल्याचे सांगितले. सेवा सप्ताह फक्त आठ दिवसांपुरताच मर्यादित न ठेवता सातत्याने आपण एकमेकांच्या संपर्कात राहून उद्योजकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा

13:57 (IST) 8 Aug 2023
गोंडगाव बालिका अत्याचार निषेधार्थ शिंदखेड्यात बंद

जळगाव जिल्ह्यातील गोंडगाव येथील बालकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणी संशयितावर कठोर कारवाई करावी, जलद न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत मंगळवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे शिंदखेडा येथे बंद पाळण्यात आला.

सविस्तर वाचा

13:52 (IST) 8 Aug 2023
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी जेरबंद

नवी मुंबई: नवी मुंबईत राहणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी ५० वर्षीय आरोपीला अटक करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

13:31 (IST) 8 Aug 2023
काटई-बदलापूर रस्त्यावरील पेव्हर ब्लाॅक, डांबराच्या पट्ट्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा खोळंबा

कल्याण: शिळफाटा रस्त्यावरील काटई ते बदलापूर रस्त्यावर १०० ते २०० मीटर अंतरावर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लाॅक, काही ठिकाणी डांबराचे २० फुटाचे पट्टे आहेत.

सविस्तर वाचा...

12:44 (IST) 8 Aug 2023
कल्याण रेल्वे स्थानकात बालकाचे अपहरण करणाऱ्या नाशिकच्या इसमाला अटक

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी एका चार वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या नाशिकच्या एका इसमाला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली.

सविस्तर वाचा...

12:29 (IST) 8 Aug 2023
वाशीम : पोषण आहारातील डाळ,चटणी निकृष्ट दर्जाची ? मुलांचे आरोग्य धोक्यात

वाशीम: जिल्ह्यात वितरीत होत असलेल्या शाळेत पोषण आहारातील डाळ व चटणी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर पोलीस कारवाई करावी, अशी मागणी केली.

सविस्तर वाचा

12:28 (IST) 8 Aug 2023
नागपूर: येथे वाघ जंगलात नाही, खाणीत राहतात; वाघ गाडीसमोर आला, अनं….

नागपूर : जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा कोळसा खाणीत रविवारी रात्री अनेकांना व्याघ्रदर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीसह आश्चर्याचा धक्का बसला.शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर ही कोळसा खाण आहे.

सविस्तर वाचा

12:12 (IST) 8 Aug 2023
भांडणातून वृद्ध महिलेचा खून तर उधारीमुळे दारुविक्रेत्याची हत्या

वर्धा: पुलगाव येथे दारूच्या उधारीतून दारू विक्रेता अकबर अली जब्बार अली याची हत्या करीत त्याचा मृतदेह अमरावती जिल्ह्यात चंद्रभागा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना उजेडात आली आहे.

सविस्तर वाचा....

12:10 (IST) 8 Aug 2023
नोकरी महोत्सवाच्या आडून राजकीय डावपेच? राष्ट्रवादीच्या उपक्रमात तीन हजार युवकांचा सहभाग

नाशिक: बेरोजगारीचा विषय राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत असल्याने भाजप, शिवसेनेपाठोपाठ आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार गट) नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून मतांची पेरणी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे आयोजित मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांच्या माध्यमातून सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली.

वाचा सविस्तर

12:06 (IST) 8 Aug 2023
Video : बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे गोरेवाड्यातील नागरिक सातच्या आत घरात…

नागपूर : गोरेवाडा परिसरात बिबट्याचा वावर नवा नाही. गोरेवाडा बचाव केंद्र आणि गोरेवाडा प्राणिसंग्रहालय होण्याआधीपासूनच येथे सुमारे १२ ते १४ बिबट्यांनी अधिवास म्हणून हे क्षेत्र निवडले होते, पण हेच बिबटे आता जातायेता नागरिकांना दर्शन देवू लागले आहेत.

सविस्तर वाचा

12:06 (IST) 8 Aug 2023
"गणेशोत्सवाआधी कोकण रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण होणार", फडणवीसांची ग्वाही

गणेशोत्सव कोकणासाठी मोठा सण असतो. त्यामुळे गणपतीआधी कोकण रेल्वे स्थानकांचं गणपतीआधी सुशोभीकरणाचं काम करण्याचा प्रयत्न करू. गणपतीआधी हे काम होतंय ही महत्त्वाची गोष्ट आहे -देवेंद्र फडणवीस

11:48 (IST) 8 Aug 2023
मुंबईत शिंदेच्या सेनेने दिला राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला धक्का

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशाची मालिका सुरूच आहे. सोमवारी रात्री ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दोन महिला नगरसेविका तर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुखाने पक्ष प्रवेश केला. या निमित्ताने शिंदेच्या सेनेने राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला धक्का दिला आहे.

वाचा सविस्तर

11:46 (IST) 8 Aug 2023
अमरावती: संत्र्याच्‍या आंबिया बहाराची तोडणी सुरू ; पण फळगळतीने…

अमरावती : जिल्‍ह्यातील संत्रापट्ट्यात आंबिया बहराची तोडणी सुरू झाली असून परराज्‍यांतूनही व्‍यापारी दाखल झाले आहेत. पण, सध्‍या फळ बागायतदार फळगळतीच्या समस्येने जेरीस आले आहेत. विदर्भातील एकूण एक लाख हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत ७५ हजार हेक्‍टरमध्‍ये लागवड ही अमरावती जिल्ह्यात आहे.

सविस्तर वाचा

11:45 (IST) 8 Aug 2023
नागपूर : शारीरिक संबंधाला नकार देणाऱ्या तरुणीवर बलात्कार

नागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी नकार देणाऱ्या तरुणीवर युवकाने बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अथर्व अशोक तुरकर (२१, तुमसर, भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा

11:43 (IST) 8 Aug 2023
मोटारी भाड्याने देणाऱ्या कंपनीची फसवणूक…पाकिस्तानी सीमेजवळील गावात विक्री

पुणे : प्रवासासाठी मोटारी भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपनीतील मोटारी चोरुन राजस्थानात पाकिस्तानी सीमेजवळील गावात विक्री करणाऱ्या एकास मध्यप्रदेशातून पोलिसांनी अटक केली.

वाचा सविस्तर...

11:34 (IST) 8 Aug 2023
चोरांची हिंमत वाढली! नागपुरात चक्क पोलिसाच्या घरी चोरी

नागपूर: शहरातील चोरांची हिंमत इतकी वाढली आहे की, त्यांनी चक्क पोलिस क्वॉर्टरमध्येच घरफोडी केली. घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून ३ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

सविस्तर वाचा...

11:22 (IST) 8 Aug 2023
चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच लोकलची धाव, सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा प्रवाशांना फटका

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अप दिशेकडे येणारी लोकल मंगळवारी सकाळी चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच धावली. परिणामी, मुंबई सेंट्रलला प्रचंड गर्दी झाली होती.

वाचा सविस्तर...

11:04 (IST) 8 Aug 2023
सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख असलेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचेच समाजमाध्यमातील खाते ‘हॅक’

समाजमाध्यमातील अनेक उच्चपदस्थ, तसेच सामान्यांची खाती सायबर चोरट्यांकडून हॅक केली जात आहेत. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

वाचा सविस्तर....

11:03 (IST) 8 Aug 2023
मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा दूरध्वनी, पोलीस यंत्रणा सतर्क

मुंबईः मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला धमकीचा दूरध्वनी आला असून येत्या एक – दोन दिवसांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला दहशतवाद्यांशी संबंध असणारी व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे या दूरध्वनीवरून सांगण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

10:52 (IST) 8 Aug 2023
"...तर एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रात होईल", संजय राऊतांचा हल्लाबोल

मुळात एनडीए आहे का? आमच्यातून तुटलेला एक गट, एनसीपीएतून तुटलेला एक तुकडा आणि इतर गोळा केलेले ताकडे-तुकडे. मुळ एनडीए कुठे आहे? मूळ एनडीए म्हणजे शिवसेना, अकाली दल, जनता दल युनायडेट, डीएमके, तृणमूल काँग्रेस, या मुख्य पक्षांनी बनवलेला एनडीए होता. कालपर्यंत आपण 'एक मोदी सबपर भारी', आम्हाला कोणाची गरज नाही, असं म्हणत होते. मग आता तुम्हाला आम्ही इंडिया स्थापन केल्यावर एनडीएची गरज का भासतेय? त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, २०२४ च्या निवडणुकीत समोरे जाताना आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हा पक्ष तोडा, तो पक्ष तोडा आणि मग एनडीएचं शेपूट जोडा. ते महाराष्ट्र सदनात येणार असतील, पण एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार. इतिहासातील सर्वांत मोठा पराभव कुठे होणार असेल तर बिहार ,महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणा या प्रमुख एनडीएचा पराभव होईल. त्यांनी महाराष्ट्र सदनात जास्तीत जास्त बैठका घ्यायला हव्यात - संजय राऊत

10:03 (IST) 8 Aug 2023
"राज्यात दंगली घडत आहेत, मग आता राज्यपाल कुठेत?" संजय राऊतांचा रोखठोक प्रश्न

महाराष्ट्रात राज्यपाल कुठे आहेत. आम्ही होतो तेव्हा राज्यपालांचं अस्तित्व होतं. आता महराष्ट्रात एवढे गुन्हे घडत आहेत. भ्रष्टाचाराच्या रोज तक्रारी होत आहेत. खून, हत्या, बलात्कार, दरोडे पडत आहेत. रोज दंगली होत आहेत. मग आता राज्यपाल कुठे आहेत? फक्त तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रातच राज्यपाल आहेत का? इतरत्र नाहीत राज्यपाल? - संजय राऊत

LIVe Blog Image

महाराष्ट् ब्रेकिंग न्यूज

Maharashtra Breaking News Live Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर