शिवेसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यसोबत आसाममधील गुवाहाटी येथे शिवेसनेचे ३३ तर अपक्ष सात असे असे एकूण ४० आमदार आहेत. शिवसेना सोडण्याचा आम्ही अद्याप निर्णय घेतला नाही. लवकरच आम्ही याबाबत आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत, असे एकीकडे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे शिवेनेच्या आमदारांनी बंड नेमके का केले? याबाबबत आमदार संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा दुपारपर्यंत ४६ च्या पुढे जाईल असेदेखील शिरसाट यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>>> महाविकास आघाडी सरकार संकटात? एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सुरतहून गुवाहाटीमध्ये दाखल

MLA Ganpat Gaikwads wife campaigns against Shinde attends rally with Vaishali Darekar
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी
Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…
nagpur bhaskar jadhav marathi news, bhaskar jadhav eknath shinde marathi news
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राजकीय निवृत्ती घेतील का?”; भास्कर जाधव म्हणाले, “तीन खासदारांचे तिकीट नाकारून…”

“हळुहळू सगळे आमदार जमा होत आहेत. दुपारपर्यंत हा आकडा ४६ च्या पुढे जाईल. यामध्ये शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर नाराजी आहे. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराजी नाही. भाजपाच्या साथीने पुढे जाणार; की राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जुळवून घेणार? याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील,” असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

हेही वाचा >>>> भायखळा ते भंडारदरा अन् पैठण ते अंबरनाथ… एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का?

तसेच, “मधला काळ हा करोनाचा होता. उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे या काळात हा निर्णय घेणे योग्य नव्हते त्यामुळे शिंदे यांनी आता निर्णय घेतला आहे, असेदेखील संजय शिरसाट यांनी सांगितले.

हिंदुत्वाशी तडजोड नाही- एकनाथ शिंदे

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण चाळीस आमदा आसामच्या गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून “कालही मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होतो. आजही आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेब आमच्यासाठी आदर्श आहोत. काल आज आणि उद्या आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमची भूमिका सुरुवातीपासूनच हिंदुत्त्वाची होती. हिंदुत्त्वाला घेऊन आम्ही तडजोड करणार नाही. लवकरच याबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.