महाराष्ट्रात मागील २४ तासात करोनाचे ७ हजार ३४७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १६ लाख ३२ हजार ५४४ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १३ हजार २४७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत १४ लाख ४५ हजार १०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रात सध्या १ लाख ४३ हजार २२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासात १८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात करोनाची बाधा होऊन ४३ हजार १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १३ हजार २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात १४ लाख ४५ हजार १०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात राज्याचा रिकव्हरी रेट ८८.५२ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख ७९ हजार १५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ३२ हजार ५४४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात सध्या २४ लाख ३८ हजार २४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर १३ हजार ५४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला १ लाख ४३ हजार ९२२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 7347 new covid19 cases 184 deaths and 13247 discharges in the last 24 hours scj
First published on: 23-10-2020 at 22:26 IST