अयोध्येत दोन महिन्यांपूर्वी प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे उद्घाटन झाले. देशभरातील भाविक प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जात आहेत. महाराष्ट्रातील भाविकदेखील वेगवेगळ्या मार्गांनी अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील नागरिकांची अयोध्येत गेल्यानंतर गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने अयोध्येत महाराष्ट्र भवनाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाठोपाठ राज्य सरकारने काश्मीरमधील श्रीनगरमध्येदेखील महाराष्ट्र भवन उभारण्याची योजना आखली आहे. बुधवारी (१३ मार्च) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीनगरमधील महाराष्ट्र भवनाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, काश्मीरमध्ये आपलं स्वतंत्र भवन उभारण्यासाठी जमीन खरेदी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. काश्मीरला भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी तसेच महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांसाठी काश्मीरमध्ये सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणार आहे. असं करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. राज्य सरकार काश्मीरमध्ये स्वतःची स्वतंत्र इमारत उभारणार आहे. काश्मीर खोऱ्यात स्वतःची स्वतंत्र राज्य इमारत असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. श्रीनगर शहराच्या बाहेर मध्य काश्मीरमधील बडगाममध्ये महाराष्ट्र भवनाची इमारत बांधली जाणर आहे. राज्य मंत्रिमंडळाने यासाठी बुधवारी जमीन खरेदीला मंजुरी दिली आहे.

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’

महाराष्ट्र सरकार श्रीनगर विमानतळाच्या जवळ इचगाम येथे २.५ एकर जमीन खरेदी करणार आहे. जम्मू काश्मीर सरकारने महाराष्ट्र सरकारला ८.१६ कोटी रुपयांमध्ये जमीन हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील पर्यटक आणि अधिकाऱ्यांना आरामदायी निवास आणि सुविधा देण्यासाठी राज्य सरकार काश्मीरमध्ये हे भवन उभारणार आहे. यासह राज्य सरकार अयोध्येतही महाराष्ट्र भवन उभारणार आहे.

हे ही वाचा >> “…तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार नाही”, काश्मीरचा दाखला देत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर देशभरातील इतर राज्यांमधील नागरिकांसाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणं शक्य झालं आहे. तसेच इतर शासकीय संस्था, कंपन्या, राज्य सरकारेदेखील काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने जमीन खरेदी करू शकतात. परंतु, अद्याप कुठल्याही राज्य सरकारने काश्मीरमध्ये जमीन खरेदी केलेली नाही. अशी कामगिरी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.