लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सहल घेऊन आलेल्या एसटी बसचा मोठा अपघात सुदैवाने बचावला. विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टाळला.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेली एसटी बस (एमएच ४० एक्यू ६२२५) प्रतापगडाहून महाबळेश्वरकडे निघाली होती. बसमधून ६० विद्यार्थी प्रवास करत होते. वाडा कुंभारोशी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर येताच एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याकडेला खोल दरीत घसरली. या वेळी एसटीची चाके मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याने मोठा अपघात वाचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व विद्यार्थ्यांना तातडीने आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. काही वेळात चालकाने बस रस्त्यावर सुरक्षित काढली. यानंतर विद्यार्थ्यांसह बस महाबळेश्वरकडे मार्गस्थ झाली. अपघातामुळे घाटात काही वेळ वाहतूक थांबली होती.