Traffic Jam Sangameshwar रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर  शास्त्रीपूल ते गणेशकृपा हॉटेल पर्यंत एकेरी वाहतूक सुरु असल्याने मुंबईवासी कोकणकरांना मोठ्या वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अर्धा ते पाऊण तास रांगेत उभे राहून वाहतुक करावी लागत असल्याने मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे शास्त्रीपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र या बांधकामामुळे येथील वाहतुक संथ गतीने सुरु आहे. मात्र मुंबईकडे जाताना गणेश कृपा हॉटेल ते शास्त्री पूल दरम्यान एकेरी वाहतुकीचा रस्ता सुरु असल्याने वाहनांच्या मानसकोंड पासून लांबच लांब रांगा लागत आहेत. मानसकोंड पासून शास्त्रीपूला पर्यंत पोहचण्यासाठी  अर्धा ते पाऊण तास लागत  असल्याने वाहन चालक चांगलेच हैराण झाले आहेत.

संगमेश्वर येथील परिस्थिती पाहता या शास्त्री पुलाचे बांधकाम गणेशोत्सवा पुर्वी पुर्ण करणे आवश्यक होते. मात्र बांधकाम विभागाने व जिल्ह्यातील नेते मंडळींनी लक्ष दिले नाही. याचा त्रास आता मुंबईकर व कोकणकरांना सहन करावा लागत आहे. येथील रस्त्यावर आलेले  खड्डे व एकेरी वाहतूक यामुळे वाहन चालकांची  पुरती कसरत करावी लागत आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या या कामाला  १७  वर्षे पुर्ण झाली तरी  कोकणवसीय मुंबई व पुणेकरांना या महामार्गाच्या कामांचा त्रास सहन करावा7 लागत आहे. हा महामार्ग दरवर्षी पूर्ण होईल अशी आश्वासने दिली जातात. मात्र पुन्हा पुन्हा या मार्गाच्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ वाहन चालकांवर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा महामार्ग २०२६ अखेरी पर्यत पुर्ण होण्याचे आश्वासन दिले आहे.  हे आश्वासन पुर्ण होण्याकडे आता कोकणकरांचे लक्ष लागुन राहिले आहे.